तिरुअनंतपुरम - सीपीएमच्या प्रमुख महिला नेत्यांपैकी एक असलेल्या CPI (M)च्या केंद्रीय समितीच्या सदस्य एमसी जोसेफिन (वय 73) यांचे कन्नूर येथे काल रविवार (दि. 10 एप्रिल)रोजी ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन निधन झाले. (CPM leader M C Josephine No More) जोसेफिन यांच्या इच्छेनुसार, त्यांचा मृतदेह आज सोमवारी (दि. 11 एप्रिल)रोजी वैद्यकीय शिक्षणासाठी कालामासरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे सुपूर्द केला जाणार आहे.
-
CPI (M) Central Committee member MC Josephine passes away
— ANI Digital (@ani_digital) April 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/ZzFOnh7Qle#MCJosephine pic.twitter.com/RXInV8RNy3
">CPI (M) Central Committee member MC Josephine passes away
— ANI Digital (@ani_digital) April 10, 2022
Read @ANI Story | https://t.co/ZzFOnh7Qle#MCJosephine pic.twitter.com/RXInV8RNy3CPI (M) Central Committee member MC Josephine passes away
— ANI Digital (@ani_digital) April 10, 2022
Read @ANI Story | https://t.co/ZzFOnh7Qle#MCJosephine pic.twitter.com/RXInV8RNy3
एकेजी रुग्णालयात दाखल करण्यात आले - त्या सीपीएम केंद्रीय समितीच्या सदस्य होत्या. जोसेफिन या पक्षाच्या कन्नूर येथे नियोजीत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, येथील कार्यक्रमातच त्या बेशुद्ध पडल्या अन् त्या जागीच कोसळल्या. त्यानंतर तातडीने त्यांना येथील एकेजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (M C Josephine Pass Away In Kannur) त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला.
अखिल भारतीय लोकशाही महिला संघटनेच्या उपाध्यक्षा - जोसेफिन या (2017 ते 2020) पिनाराई विजयन सरकारच्या काळात साडेचार वर्षांसाठी केरळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्या अखिल भारतीय लोकशाही महिला संघटनेच्या उपाध्यक्षा आणि प्रदेशाध्यक्षाही होत्या. तसेच, जोसेफिन यांनी ग्रेटर कोचीन विकास प्राधिकरण (GCDA)च्या अध्यक्षा आणि कोची विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले.
आज अंत्यसंस्कार करण्यात येणार - सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते सी. एन. म्हणाले की, जोसेफिन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कन्नूर येथील AKGरुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जोसेफिन यांच्या इच्छेनुसार, त्यांचा मृतदेह आज सोमवारी (दि. 11 एप्रिल)रोजी वैद्यकीय शिक्षणासाठी कालामासरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे सुपूर्द केला जाणार आहे.
हेही वाचा - Yechury Again General Secretary : सीपीएम सरचिटणीस पदी सीताराम येचुरी यांची तिसऱ्यांदा निवड