ETV Bharat / bharat

'राष्ट्रबांधणीसाठी एनएसएसच्या तरुणांनी कठोर परिश्रम घ्यावे' - CP Rachakonda latest news

एनएसएसमधील सेवा हा शब्द विसरू नका. प्रार्थना करणाऱ्यापेक्षा इतरांना मदत करणारे हात अधिक पवित्र असतात. म्हणून प्रत्येक तरूणांनी उदात्त कारणाने समाजाला मदत केली पाहिजे. मानवतेची सेवा हीच देवाची सेवा असते. भगवंताने आम्हाला दोन हाते ही विधायक कामे करण्यासाठी दिली आहेत, असे भागवत म्हणाले.

रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत
रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत
author img

By

Published : Nov 29, 2020, 4:57 PM IST

हैदराबाद - राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एनएसएस पश्चिम विभागाकडून प्रजासत्ताक दिन परेड शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर 21 ते 29 नोव्हेंबरदरम्यान अनुराग विद्यापाठीमध्ये घेण्यात आले. यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव-दमन, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधील एनएसएसने सहभाग घेतला. यावेळी रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी शिबिर समाप्ती कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

एनएसएसमधील सेवा हा शब्द विसरू नका. प्रार्थना करणाऱ्यापेक्षा इतरांना मदत करणारे हात अधिक पवित्र असतात. म्हणून प्रत्येक तरूणांनी उदात्त कारणाने समाजाला मदत केली पाहिजे. मानवतेची सेवा हीच देवाची सेवा असते. भगवंताने आम्हाला दोन हाते ही विधायक कामे करण्यासाठी दिली आहेत, असे भागवत म्हणाले.

कोरोना परिस्थितीमध्येही शिबिराचे योग्य आयोजन केल्याबद्दल महेश भागवत यांनी आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमात अनुराग विद्यापीठाचे संचालक पल्ल अनुराग, सी. मल्लेशा शिबिराचे समन्वयक, एनएसएसचे रामकृष्ण प्रादेशिक संचालनालय आणि 7 राज्यातील 200 एनएसएस तरुण उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.