बंगळुरू - गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बेलगावी पोलिसांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली 6 जणांविरोधात एफआयआर दाखल केला. बेलागावी पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. बैठकीचे आयोजन करणार्या 6 जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही बैठक गेल्या 14 जानेवारीला झाली होती, असे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.
सरकारी वकिलांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे लागू करण्यासंदर्भातील जनहित याचिकांवर सुनावणी करत असलेल्या मुख्य न्यायाधीश ए.एस. ओका यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार 14 जून रोजी बैठकीच्या आयोजकांवर एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल यांनी कोर्टात दिली. बैठकीत मास्क न घातलेल्यांवर कारवाई केली जावी, असे कोर्टाने म्हटलं. तपासणीनंतर उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाईल. यावर तपास अहवाल सादर करावा, असे सुचवून खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.