हैदराबाद- भारतात गेल्या 10 दिवसांत 13 कोटींच्यावर कोरोना चाचण्या केल्या असल्याची माहिती शनिवारी आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नुसार 20 नोव्हेंबरपर्यंत 13.06 कोटींपेक्षा जास्त रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. तर शुक्रवारी 10,66,022 रुग्णांची चाचणी करण्यात आली. केंद्र लवकरच 'कोव्हिन' हे अॅप आणणार आहे. ज्याचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकांपर्यत लस वितरण करण्याकरीता केला जाईल, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
नवी दिल्ली- सार्वजनिक ठिकाणी कोरोनासंबंधीत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या 1306, तर सोशल डिन्स्टसिंगचे उल्लंघन करणाऱ्या 51 जणांना दंड ठोठावण्यात आला. तसेच गरजू नागरिकांना मास्कचे वाटपही करण्यात आले.
मुंबई - दिल्लीतील कोरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता मुंबईतून दिल्ली जाणाऱ्या तसेच दिल्लीतून मुंबईत येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती प्रधान सचिव संजय कुमार यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता राज्य सरकार अनेक उपाययोजना करीत आहे. हा त्याचाच एक भाग असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, गोव्यातील दहावी आणि बारावीच्या शाळा शनिवापासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे जवळपास आठ महिने या शाळा बंद होत्या. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना थर्मल स्क्रीनिंग, हात स्वच्छ करणे, मास्क घालणे, वर्गात सोशल डिन्स्टसिंगचे पालन करणे. या सारख्या कोविड- 19 च्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश शाळांना शाळांना दिले अल्याचेही त्यांनी सांगितले.
गांधीनगर - कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सरकारने शनिवारपासून सुरत, वडोदरा आणि राजकोट येथे रात्री कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत लागू असेल कर्फ्यू दरम्यान वैद्यकीय दुकाने, रुग्णालये, दवाखाने, दुग्धशाळे आणि पेट्रोलियम, सीएनजी पंप यासारख्या अत्यावश्यक सेवा चालू राहतील. रेल्वे आणि हवाई प्रवासी तसेच विविध स्पर्धा परीक्षेस बसणार्या उमेदवारांना वैध प्रवासी तिकिटे आणि प्रवेशपत्रे असतील, तर त्यांना कर्फ्यू दरम्यान फिरण्याची परवानगी दिली जाईल. दरम्यान राज्यात शुक्रवारी 1420 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली.
चंदीगड- कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड-19 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील 15 जणांची माहिती घेण्याचे निर्देश मुख्य सचिव विनी महाजन यांनी दिले आहे.
शिमला - कोविड-19 ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शिमला जिल्हाप्रशासनाने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांसाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहे. तसेच शिमला जिल्हा प्रशासनाकडून रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, किराणा, दूध, फळे, भाज्या, औषधांसारखा अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार आहे.