ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

पीफाईझर नंतर अमेरिकेतील दुसरी औषधनिर्मिती कंपनी मोडर्ना ही देखील तिच्या कोरोना लसीच्या लेट-स्टेज टेस्टींगचे पहिले अंतरिम विश्लेषण लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.

corona review india
कोरोना रुग्ण आढावा भारत
author img

By

Published : Nov 16, 2020, 2:42 AM IST

हैदराबाद - पीफाईझर नंतर अमेरिकेतील दुसरी औषधनिर्मिती कंपनी मोडर्ना ही देखील तिच्या कोरोना लसीच्या लेट-स्टेज टेस्टींगचे पहिले अंतरिम विश्लेषण लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. मोडर्नाची लस ही पीफाईझर सारख्याच एमआरएनए तंत्रज्ञानावर काम करते. त्यामुळे, पीफाईझर प्रमाणे ती देखील कोरोनावर प्रभावी ठरेल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

corona review india
कोरोना रुग्णसंख्या भारत

जगात १५० पेक्षा अधिक कोविड १९ लसींची निर्मिती सुरू आहे. त्यातील ४४ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू आहे, तर ११ लसींचे लेट-स्टेज टेस्टींग सुरू आहे.

दरम्यान, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ८८ लाख १४ हजार ५७९ इतकी आहे. यातील ८२ लाख ५ हजार ७२८ रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. देशात ४ लाख ७९ हजार २१६ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून १ लाख २९ हजार ६३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला दिलासा देणारी बातमी आहे. काल राज्यात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात केवळ २ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. दिवसभरात ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आजपासून राज्यातील मंदिरे उघडण्यात येणार आहेत.

दिल्ली - राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांनी, कोरोना चाचण्यांची संख्या दिवसाला १ लाखावर नेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. दरम्यान, दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या ही ४ लाख ८५ हजार ४०५ इतकी आहे.

केरळ - मंडाला-माकाराविलाक्कूच्या पार्श्वभूमावर सब्रिमला येथील अय्यपा मंदिर काल उघडण्यात आले. मात्र, भक्तांना आजपासून मंदिरात प्रवेश मिळणार आहे.

कर्नाटक - ऑक्टोबरच्या मध्यापासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. आता सरकारने अजून एक निर्णय घेत राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी घातलेले क्वारंटाईनचे नियम शिथिल करण्याचे ठरवले आहे. जे प्रवाशी कोविड १९ नसल्याचे प्रमाणपत्र दाखवतील त्यांना अनिवार्य असलेल्या गृह विलगीकरणातून सूट मिळणार आहे.

हेही वाचा- मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.