नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले आहे. त्यातील अनेक नागरिक अद्यापही कोरोनामुळे झालेल्या गुंतागुंतीच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे कोरोनाचे परिणाम अद्यापही नागरिकांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करत आहेत. त्यातच आता SARS-CoV-2 विषाणूची लागण झालेल्या नागरिकांच्या जीनोम संरचनेत बदल जाणवू शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या नागरिकांच्या रोग प्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम होत असल्याचेही या संशोधनात स्पष्ट झाले आहे. आपल्या पेशींमधील अनुवांशिक पदार्थ क्रोमॅटिन नावाच्या संरचनेत साठवले जातात. त्यामुळे काही विषाणूंनी क्रोमॅटिनच्या संरचनेत बदल केल्याची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा आपल्या क्रोमॅटिनवर होऊ शकतो परिणाम : कोरोनाच्या SARS-CoV-2 या विषाणूंचा आपल्या क्रोमॅटिनवर परिणाम होऊ शकतो की नाही हे संशोधकांना माहीत नव्हते. कोविड-19 संसर्गानंतर मानवी पेशींमधील क्रोमॅटिन आर्किटेक्चरचे सर्वसमावेशक वर्णन नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात करण्यात आले आहे. सामान्य पेशीच्या अनेक सुसज्ज क्रोमॅटिन आर्किटेक्चर्स संसर्गानंतर अव्यवस्थित होत असल्याचे या संशोधनात आम्हाला आढळल्याची माहिती टेक्सास विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विभागाचे प्राध्यापक वेन्बो ली यांनी दिली. कोरोनाच्या या विषाणूचे सामान्य आकार एकत्र मिसळून त्याचे यीन आणि यांग हे भाग गमावत असल्याचेही ली यांनी यावेळी नमूद केले आहे.
शरीर रक्तामध्ये सोडते सायटोकीन : कोरोनाच्या या विषाणूमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. मात्र शरीर रक्तात सायटोकीन सोडते. त्यामुळे सायटोकाइन ही एक तीव्र रोगप्रतिकारक प्रतिक्रिया असते. असे मिश्रण काही महत्त्वाच्या जनुकांमध्ये बदल होण्याचे कारण असू शकते. यामध्ये एक महत्त्वपूर्ण दाहक जनुक, इंटरल्यूकिन -6 समाविष्ट आहे. त्यामुळे गंभीर COVID-19 रुग्णांमध्ये सायटोकीन समाविष्ट होऊ शकते.
शरीरात एकाच वेळी सायटोकिन्स सोडणे हानिकारक : सामान्य रोगप्रतिकारक प्रतिसादांमध्ये सायटोकिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु शरीरात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात सायटोकिन्स सोडणे हानिकारक असू शकते. क्रोमॅटिनवरील रासायनिक बदल देखील SARS-CoV-2 ने बदलले आहेत. क्रोमॅटिनच्या रासायनिक बदलांचे जनुकांच्या अभिव्यक्ती आणि फेनोटाइपवर दीर्घकालीन प्रभाव पाडण्यासाठी ज्ञात होते, असेही या संशोधनात योगदान देणाऱ्या झियाओयी युआन यांनी स्पष्ट केले आहे. हे निष्कर्ष व्हायरसचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाचा मार्ग मोकळा करतील अशी संशोधकांना आशा असल्याचेही युआन यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - World Tuberculosis Day 2023 : जागतिक आरोग्य संघटनेचा क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचा निर्धार, जाणून घ्या किती होतात टीबीमुळे मृत्यू