कोट्टायम (केरळ) - येथील पाला गावात एका जोडप्याने आपल्या मुलीचे नाव चक्क इंडिया ठेवले आहे Couple names daughter India. सध्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत 75th Independence Day celebrations. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यत येत आहे. त्यामुळे या काळात जन्म झाल्याने मुलीचे नाव इंडिया ठेवले असे तिच्या पालकांनी सांगितले. रंजित राजन आणि सना यांनी आपल्या मुलीचे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. तिचा जन्म 12 जुलै रोजी झाला. जेव्हा आपली मुलगी मोठी होईल तेव्हा या नावाचा अभिमान वाटेल असे पालकांना वाटते.
इंडिया हे नाव आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे तिच्यासाठीही ती अभिमानाची गोष्ट असेल - रंजीत राजन
रंजितला मोठा झाल्यावर लष्करात भरती व्हायचे होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. नववीत शिकत असताना त्याला शाळा सोडावी लागली.
"मी या देशासाठी काहीही करू शकलो नाही याचे मला नेहमीच दुःख होते. मी तेव्हाच ठरवले होते की मला मुलगी झाली तर तिचे नाव मी इंड्या ठेवीन. - रंजित राजन सांगतात.
रंजितने जन्म प्रमाणपत्र नोंदणी फॉर्मसाठी नावाच्या रकान्यात इंडिया लिहिले तेव्हा नर्सने त्याला दुरुस्त करून सांगितले की हा स्तंभ राष्ट्रीयत्व लिहिण्यासाठी नव्हता. त्यानंतर रंजितने तिच्या मुलीचे नावच इंडिया ठेवल्याचे सांगून नर्सलाच आश्चर्याचा धक्का दिला.
रंजित हा एका खाजगी कंपनीत चालक म्हणून काम करतो. वेगळ्या समाजातील सनाच्या तो प्रेमात पडला. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2021 रोजी कुटुंबीयांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून त्याने तिच्याशी लग्न केले. या जोडप्याचा असा विश्वास आहे की त्यांची मुलगी ही जाती-धर्माचा विचार न करणारी खरी भारताची प्रतिनिधी असेल.
हेही वाचा - Man beaten woman, महिलेला नग्न करुन बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल