नवी दिल्ली: अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ( Athletics Federation of India ) द्वारे 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय भाला दिवस साजरा केला जाणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू नीरज चोप्रा यांच्या स्मरणार्थ देशात प्रथमच राष्ट्रीय भालाफेक दिन साजरा केला ( National Javelin Day Celebrate on 7th August ) जाणार आहे.
भालाफेक चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या खंडारा या गावात राष्ट्रीय भालाफेक दिन साजरा करण्याचा उपक्रम घेण्यात ( Countrys first national javelin day )आला. ग्रामस्थ, खेळाडू व प्रशिक्षक यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये देशभरातील भालाफेकपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे.
तरुणांना भालाफेक या खेळाकडे प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच भालाफेक दिन साजरा केला जात आहे. त्यासाठी 7 ऑगस्टचा दिवस निवडण्यात ( National Javelin Day on 7th August ) आला. कारण गेल्या वर्षी 7 ऑगस्टलाच नीरज चोप्राला भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते.