नवी दिल्ली : बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीत देण्यात आलेल्या माहिती नुसार भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण 4 हजार 868 वर पोहोचले आहेत. तर बरेच लोक बरे होऊन मायदेशी किंवा परदेशात परतले आहेत. संसर्गातून बरे होऊन 60 हजार 405 रुग्ण घरी परतले आहेत. आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 9 लाख 55 हजार 319 वर गेली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, काल भारतात कोरोना विषाणूचे 17 लाख 61 हजार 900 नमुने तपासण्यात आले आहेत. मंगळवारपर्यंत एकूण 69 कोटी 52 लाख 74 हजार 380 नमुने तपासण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, मंगळवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 68 हजार 063 नवीन रुग्ण आढळले, त्यानंतर एकूण संक्रमितांची संख्या 3 कोटी 58 लाख 75 हजार 790 झाली आहे.
काल, एका दिवसात पॉझिटिव्ह केसेस कमी झाल्यामुळे पॉझिटिव्ह रेटमध्ये किंचित घट झाली होती. काल, दैनंदिन पाॅझिटिव्हीटी दर 10.64 टक्के नोंदवला गेला होता, जो सोमवारी 13.29 टक्के होता. त्याच वेळी, ओमायक्रॉन चे रुग्णही वाढत आहेत. देशात या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4 हजार 868 आहे. भारतातील ओमायक्रॉन पैकी 1 हजार 711 लोक बरे होऊन मायदेशी किंवा परदेशात परतले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत आणखी 277 मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 4 कोटी 84 लाख 231 रुग्णांचा कोरोना होऊन मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजारही होते. मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) आकडेवारीशी त्यांची आकडेवारी जुळत आहे.