ETV Bharat / bharat

कोरोना कमी होतोय! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54 हजार रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 96.61 वर - देशातील कोरोना रुग्णांची लेटेस्ट संख्या

कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या सुमारे तीन लाखांच्या पुढे गेली आहे. तर देशातील रिकव्हरी रेट 96.61 वर पोहचला आहे. मृत्यू दर हा 1.30 आणि सक्रिय रुग्णांचा दर 2.08 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 64,89,599 हजार जणांना लस टोचवण्यात आली असून आतापर्यंत एकूण 30,16,26,028 जणांचे लसीकरण झाले आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Jun 24, 2021, 12:01 PM IST

नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही वाढत असल्याचे दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातच भारतात गेल्या 24 तासांत 54,069 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 1,321 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 68,885 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या सुमारे तीन लाखांच्या पुढे गेली आहे. तर देशातील रिकव्हरी रेट 96.61 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर हा 1.30 आणि सक्रिय रुग्णांचा दर 2.08 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 64,89,599 हजार जणांना लस टोचवण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 30,16,26,028 जणांचे लसीकरण झाले आहे.

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...

  • एकूण रुग्ण : 3,00,82,778
  • सक्रिय रुग्ण संख्या : 6,27,057
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,90,63,740
  • एकूण मृत्यू : 3,91,981
  • एकूण लसीकरण: 30,16,26,028

'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे वाढली चिंता -

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. देशात आजपर्यंत 40 रुग्ण 'डेल्टा प्लस'चे आढळले आहेत. यातील सर्वांत जास्त रुग्ण हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू राज्यात आढळले आहेत. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास 'डेल्टा' व्हेरियंट कारणीभूत ठरला होता. आता तिसरी लाट 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे पसरणार असल्याचे बोलले जात आहे. डेल्टा प्रकार जगातील 80 देशांमध्ये आहे. तर डेल्टा प्लस हा व्हॅरिएंटसध्या ब्रिटन, अमेरिका, जपान, रशिया, भारत, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीन या 9 देशांमध्ये आढळला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.