ETV Bharat / bharat

कोरोना लसीचे दोन डोस एकत्र घेण्याने दुष्परिणाम होतील का? वरिष्ठ डॉक्टर सोनू गोयल यांच्याशी बातचित - corona vaccination

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये असा प्रकार समोर आला. राज्याच्या दौसा गावातील एका महिलेला दहा मिनिटांच्या अंतराने कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले. यानंतर ही महिला घाबरली. आपल्याला काही दुष्परिणाम तर नाहीत ना होणार अशी भीती तिला वाटू लागली. याबाबतच ईटीव्ही भारत हरियाणाच्या प्रतिनिधींनी चंदीगढ पीजीआयचे वरिष्ठ डॉक्टर सोनू गोयल यांच्यासोबत बातचीत केली आहे. डॉ. सोनू हे पीजीआय मधील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागात प्राध्यापक आहेत.

corona-vaccine-side-effects-if-person-get-two-dose-at-a-same-time
कोरोना लसीचे दोन्ही डोस एकत्र घेण्याने दुष्परिणाम होतील का? विशेष रिपोर्ट..
author img

By

Published : Jun 1, 2021, 8:02 PM IST

Updated : Aug 27, 2021, 12:46 PM IST

चंदीगड : कोरोनापासून बचाव म्हणून सध्या जगभरात सगळीकडे लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. विविध कंपन्यांच्या लसींचा वापर करुन लोकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सर्व सरकार करत आहेत. विषाणूची दुसरी लाट ही पहिल्या लाटेहून अधिक धोकादायक असल्यामुळे लसीकरणाचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, यासोबतच लोकांच्या मनामध्ये लसींबाबत कित्येक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. यापैकीच एक प्रश्न म्हणजे लसींचे दोन डोस एकाच वेळी घेतले, तर काय होईल?

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये असा प्रकार समोर आला. राज्याच्या दौसा गावातील एका महिलेला दहा मिनिटांच्या अंतराने कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले. यानंतर ही महिला घाबरली. आपल्याला काही दुष्परिणाम तर नाहीत ना होणार अशी भीती तिला वाटू लागली. याबाबतच ईटीव्ही भारत हरियाणाच्या प्रतिनिधींनी चंदीगढ पीजीआयचे वरिष्ठ डॉक्टर सोनू गोयल यांच्यासोबत बातचीत केली आहे. डॉ. सोनू हे पीजीआय मधील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागात प्राध्यापक आहेत.

कोरोना लसीचे दोन्ही डोस एकत्र घेण्याने दुष्परिणाम होतील का? विशेष रिपोर्ट..

एका वेळी दोन डोस घेतल्याने धोका निर्माण होतो का?

डॉ. सोनू यांनी सांगितले, की कोरोना लसीचे दोन डोस एकाच वेळी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याबाबत अद्याप जास्त संशोधन झाले नाही. कारण असे प्रकार अगदीच कमी प्रमाणात समोर आले आहेत. मात्र त्याचबरोबर, एकाच वेळी दोन डोस घेतल्यामुळे आतापर्यंत कोणाला दुष्परिणाम जाणवल्याचेही प्रकरण अद्याप समोर आले नाही.

कोणत्याही लसीच्या दोन डोसेसने दुष्परिणाम होत नाहीत..

कोरोनावरील लसही इतर लसींप्रमाणेच आहे. इतर लसींचेही दोन डोस एका वेळी घेतल्यामुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत. तोच प्रकार कोरोना लसीच्या बाबतीत. लसीचे काम शरीरात अँटीबॉडी बनवणे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडीजचा स्तर वेगवेगळा असतो. त्यामुळे लसींच्या प्रमाणाने जास्त फरक पडत नाही.

एका वेळी दोन डोस घेतले, तर पुन्हा दुसरा डोस घ्यावा?

जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन डोस दिले, तर त्या व्यक्तीने पुन्हा डोसच घेऊ नये असं नसतं. एकाच वेळी दोन डोस जरी दिले, तरी त्याला एकच डोस समजला जातो. त्यानंतर निर्धारीत वेळेनंतर (एक किंवा तीन महिने) त्या व्यक्तीला दुसरा डोस घ्यावाच लागतो.

हेही वाचा : भारतातील कोरोना स्ट्रेन्सना मिळाली ओळख; 'काप्पा' आणि 'डेल्टा' अशी नावं

Last Updated : Aug 27, 2021, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.