नवी दिल्ली: आरोग्य मंत्रालयाने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, भारतात गेल्या 24 तासात 2 लाख 82 हजार 970 नविन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जे कालच्या तुलनेत 18 टक्यांनी वाढले आहेत. पाॅझिटिव्हीटी दर जो संक्रमणाच्या प्रसाराचा सुचक मानण्यात येतो तो 14.43 टक्यांवरुन 15.13 टक्यावर पोचला आहे. देशात वेगाने पसरत असलेल्या ओमायक्राॅन या व्हेरियंटचे 8 हजार 961 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. कालच्या तुलनेत हे प्रमाण 0.79 टक्क्यांनी वाढले आहे.
देशातील सक्रिय रुग्ण - 18.31 लाख
बरे होणारे रुग्ण - 1.88 लाखांपेक्षा जास्त
रुग्ण बरे होण्याचा दर - 93.88 टक्के
तपासण्या - 70.74 कोटी
24 तासांतील चाचण्या - 18.69 लाखांपेक्षा जास्त
कालच्या तुलनेत 2 लाखांहून अधिक.
वाटप झालेले लसींचे डोस - 158 कोटींहून अधिक