ETV Bharat / bharat

LIVE UPDATE : चिंताजनक! राज्यात बुधवारी 13 हजार 659 कोरोना रुग्णांची नोंद

corona LIVE Update
चालू वर्षातला कोरोना रुग्णांचा सर्वाधिक आकडा
author img

By

Published : Mar 11, 2021, 7:54 AM IST

Updated : Mar 11, 2021, 12:03 PM IST

08:40 March 11

पहिल्याच दिवशी 495 व्यापाऱ्यांची अंटीजन टेस्ट

बीड - जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्याबाबत सूचना केल्या होत्या. बुधवारी व्यापाऱ्यांनी अँटीजन टेस्टसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. पहिल्याच दिवशी 495 व्यापाऱ्यांची अंतिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी केवळ 9 व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह निघालेल्या व्यापाऱ्यांना होम आयसोलेशनची परवानगी द्या, अशी मागणीदेखील यावेळी व्यापाऱ्यांनी केली आहे.

08:29 March 11

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर, आजपासून कठोर निर्बंध लागू

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून आजपासून पालिका प्रशासनाकडून कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेसह लग्न व हळदी समारंभांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तर हे टाळेबंदी नसून निर्बंध लागू करण्यात आल्याचेही यावेळी पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

07:52 March 11

कोरोना केंद्रात आढळल्या मद्याच्या बाटल्या

जळगाव - शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाने चक्क 4 मद्याच्या बाटल्या तसेच गुटख्याच्या पुड्या आतमध्ये आणल्या होत्या. मद्य पिऊन तो रुग्ण गोंधळ घातला होता. या प्रकाराची माहिती होताच महापौर भारती सोनवणे यांनी सेंटरमध्ये धाव घेत मद्यपी रुग्णांची कानउघाडणी केली. मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत असून, महापौर भारती सोनवणे सेंटरमध्ये भेट देऊन रुग्णांची विचारपूस करीत असतात. बुधवारी अविनाश पाटील नामक एक रुग्ण मद्य पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती महापौर सोनवणे यांना मिळाली. त्यानंतर त्या तत्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. विजय घोलप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

07:49 March 11

आनंदवन पुन्हा एकदा कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

चंद्रपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रख्यात आनंदवन पुन्हा एकदा कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरले आहे. सध्या येथे तब्बल 239 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असल्याने प्रशासनाने येथेच कोविड केअर केंद्र उघडले आहे. येथे तपासणी करण्यात आलेल्यापैकी 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या एकूण 83 प्रकल्प रहिवाशांवर सुरू आहेत. स्थानिक आरोग्य यंत्रणेने परिसरात चाचण्यांसाठी केंद्र उभारले आहे. वरोरा आणि त्यातही आनंदवन प्रकल्प कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे.

07:45 March 11

औरंगाबाद जिल्ह्यात मोठी रुग्णवाढ

औरंगाबाद -  जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभरात 550 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या आजपर्यंतची उच्चांकी संख्या असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंतेत भर पडली आहे. रोज नव्याने 400 च्यावर रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. जिह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये सकाळी सहा ते रात्री नऊ या काळातच बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शनिवार आणि रविवार दोन दिवस बाजारपेठा, हॉटेल, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

07:42 March 11

पुण्यात टाळेबंदी नाही, पण कडक निर्बंध लावण्यात येतील

पुणे - शहरात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात पुणे शहरात फक्त 1500 सक्रीय रुग्णसंख्या होती. ती आजमितीला 7000 वर गेली आहे. पुणे शहरात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शहरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच शाळा महाविद्यालयेदेखील 14 तारखेपर्यंत बंद करण्यात आले आहे. असे असले तरी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी येणाऱ्या काळात पुणे शहरात टाळेबंदी नव्हे, तर अजून काही कडक निर्बंध लावण्यात येतील, असे संकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पुणे शहरातील कोरोनाबाबतची बैठक येत्या दोन दिवसात पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत शहरात काही निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

07:33 March 11

चालू वर्षातला कोरोना रुग्णांचा सर्वाधिक आकडा

live update
कोरोना रुग्णसंख्या

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी राज्यात 13 हजार 659 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा हा नवीन वर्षातील सर्वात जास्त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच मुंबई शहर परिसरात आज 1539 नवे रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Last Updated : Mar 11, 2021, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.