ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल : सियालदह मेट्रो स्थानकाचे उद्घाटन, ममतांना निमंत्रण न दिल्याने वाद.. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

उद्या (सोमवारी) पश्चिम बंगालमध्ये सियालदह मेट्रो स्टेशनचे उद्घाटन होत ( Sealdah Metro station inauguration ) आहे. मात्र, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यावरून आता वाद निर्माण झाला ( Controversy Over Metro Station Inauguration ) आहे. तृणमूल काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे.

Mamata Banerjee Smriti Irani
ममता बॅनर्जी स्मृती इराणी
author img

By

Published : Jul 10, 2022, 1:38 PM IST

कोलकाता ( पश्चिम बंगाल ) : पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या सियालदह मेट्रो स्टेशनचे सोमवारी (11 जुलै) उद्घाटन होणार ( Sealdah Metro station inauguration ) आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालचा दौरा करणार आहेत. सीएम बॅनर्जी यांना उद्घाटन समारंभाचे निमंत्रण न दिल्याने वाद निर्माण झाला ( Controversy Over Metro Station Inauguration ) आहे. तृणमूल काँग्रेसने केंद्रावर सूडाचे राजकारण करण्याचा आणि प्रशासकीय शिष्टाचार न दाखवण्याचा आरोप केला.

स्मृती इराणी करणार उद्घाटन : राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य असूनही भाजपशासित केंद्र सरकार किमान सौजन्य दाखवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप परिवहन मंत्री फरहाद हकीम यांनी केला. ते म्हणाले, 'केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी एका कार्यक्रमात सियालदह मेट्रो स्टेशनचे उद्घाटन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी त्या शहरात येण्याची शक्यता आहे. मात्र, राज्याचे भाजप नेते शमिक भट्टाचार्य यांनी टीएमसीवर नाराजी व्यक्त करत राज्य सरकार मेट्रो प्रकल्पासाठी सर्व प्रकारचे अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप केला. "राज्य सरकारमुळेच या प्रकल्पाची किंमत 5 ते 6 कोटी रुपयांनी वाढली आहे," असा आरोप भट्टाचार्य यांनी केला.

रेल्वे ओव्हरब्रीजच्या उद्घाटनाला रेल्वे अधिकाऱ्यांनाच बोलावले नाही : यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कामरकुंडू येथे रेल्वे ओव्हरब्रिजचे उद्घाटन केले होते. मात्र या कालावधीत आयोजित कार्यक्रमाला रेल्वे अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नाही. या घटनेनंतर भाजप आणि तृणमूलमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात हुगळी जिल्ह्यातील कमरकुंडू येथे रेल्वे ओव्हरब्रिजचे उद्घाटन केल्याने तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप यांच्यात शब्दयुद्ध सुरू झाले होते. बॅनर्जी यांनी भारतीय रेल्वेच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित केले नाही, असे विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने सांगितल्यावर सत्ताधारी टीएमसीने प्रत्युत्तर दिले की, केंद्र सरकारने दोन सरकारांच्या निधीतून उभारलेल्या प्रकल्पांचे उद्घाटनही केले.

हेही वाचा : Mamata Banerjee : एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू जिंकू शकतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक.. ममतांनी स्पष्टच सांगितलं..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.