नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ( Gujarat Assembly Election 2022 ) काँग्रेसने शुक्रवारी 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोधवाडिया यांचे नाव प्रमुख आहे. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मोधवाडिया यांना पोरबंदरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ( Congress Releases First list )

यासोबतच अकोटातून ऋत्विक जोशी, रावपुरातून संजय पटेल आणि गांधीधाममधून भरत व्ही. सोलंकी यांना तिकीट देण्यात आले आहे. गुजरातमधील 182 विधानसभा जागांपैकी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
