शिमला - भारतीय निवडणूक आयोगाने देशातील 3 लोकसभा आणि 30 विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेता राहुल गांधी हे शिमल्यावरून दिल्लीला परतले आहेत.
देशातील 3 लोकसभा आणि 30 विधानसभेच्या जागांकरिता 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 2 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सोनिया गांधी या 20 सप्टेंबरला सुट्टी घालविण्याकरिता शिमला येथे पोहोचल्या होत्या. शिमल्यामधील छराबडा येथे प्रियंका वड्रा यांच्या घरी सोनिया राहिल्या होत्या. राहुल गांधी हे 20 सप्टेंबरला शिमल्यात पोहोचले होते. दोन दिवस थांबून राहुल हे दिल्लीला परतले होते.
हेही वाचा-गोवा काँग्रेसमध्ये गटबाजी; आमदारकीचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो तृणमूलच्या वाटेवर
शिमल्यात गांधी परिवाराचा होता खासगी दौरा
मिळालेल्या माहितीनुसार सोनिया गांधी व राहुल गांधी हे सकाळी साडेदहा वाजता छराबडावरून रस्ते मार्गाने चंदीगडला रवाना झाल्या होत्या. ते चंदीगडवरून दिल्लीपर्यंत हवाई मार्गाने जाणार आहेत. संपूर्ण गांधी परिवार सुट्ट्या घालविण्यासाठी शिमला येथे आले होते. सोनिया गांधी यांच्यापूर्वी प्रियंका वड्रा या कुटुंबासह शिमला येथे पोहोचल्या होत्या. गांधी परिवाराचा हा खासगी दौरा होता. या काळात काँग्रेसचा कोणताही नेता त्यांना भेटण्यासाठी छराबडा येथे पोहोचला नाही.
हेही वाचा-काँग्रेसवर नाराज असलेले अमरिंदर सिंग दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांची घेणार भेट?
हिमाचल प्रदेशमध्ये या जागांवर होणार निवडणूक
हिमाचल प्रदेशमधील मंडी, फतेहपूर, अर्की व जुब्बल कोटखाई या विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहे. मंडीसहित तीन जागांवर विधानसभा निवडणुका पार पडाणार आहेत. त्यासाठी 8 ऑक्टोबरला उमेदवारांचे नामांकन तर 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचे निधन झाल्याने मंडी येथे पोटनिवडणुका होणार आहे. तर फतेहपूरमध्ये काँग्रेसचे आमदार सुजान सिंह पठानिया, अर्की येथे वीरभद्र सिंह आणि जुब्बल कोटखाई येथे नरेंद्र बरागटा यांच्या निधनानंतर विधानसभांची पोटनिवडणूक होणार आहे.
हेही वाचा-नवज्योत सिंग सिद्धूंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा; अमरिंदर सिंग यांनी लगावला टोला
पंजाबमध्ये राजकीय भूकंप
नवज्योत सिंग सिद्धूने मंगळवारी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योत सिंग यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले, की पक्षाची सेवा सुरुच ठेवणार आहे. सिद्धू यांनी चालू वर्षात जुलैमध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले अमरिंदर सिंग हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची चर्चा आहे.