कोलकाता - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) नेतृत्त्वाखालील डावे पक्ष आणि काँग्रेसकडून पश्चिम बंगाल राज्यात संयुक्त रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बंगालमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर डावे पक्ष आणि काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
जागा वाटपाची चर्चा सुरू -
कोलकात्यातील ब्रिगेड परेड मैदानाही काँग्रेस आणि डाव्या पक्षांची सभा येत्या काही दिवसांत होणार आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बंगाल विधानसभा निवडणुकीत युती केली आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांत जागा वाटपाचाी बोलणी सुरू असून अद्याप जागा वाटपाचा फार्म्युला ठरला नाही. भाजपानेही बंगालमध्ये संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. तृणमूलचे सरकार खाली खेचण्यासाठी मागील काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बंगाल दौरे सुरू आहेत.
एप्रिल-मे महिन्यात होणार निवडणुका
एप्रिल-मे महिन्यात बंगाल राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी सहमती दर्शवली आहे. २९४ सदस्यांच्या विधनासभेसाठी निवडणुका होणार आहेत. ममता सरकार विरोधात भाजपानेही जोरदार मोहिम उघडली असून निवडणुकांची पूर्व तयारी सुरू केली आहे.