ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Visited Furniture Market : फर्निचर मार्केटमध्ये राहुल गांधींनी हाती घेतली 'करवत'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 8:12 PM IST

Rahul Gandhi Visited Furniture Market : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कीर्ती नगर फर्निचर मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथं कारागिरांसोबत संवाद साधला. दिल्लीच्या कीर्ती नगर फर्निचर मार्केटमध्ये त्यांनी कामगारांच्या समस्या जाणुन घेतल्या.

Rahul Gandhi Visited Furniture Market
Rahul Gandhi Visited Furniture Market

नवी दिल्ली Rahul Gandhi Visited Furniture Market : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अचानक कीर्ती नगर फर्निचर मार्केटमध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील अनेक कारागिरांची भेट घेतली. काँग्रेसनं या भेटीचे फोटो 'X' (पूर्वीचे ट्विटर) सोशल साईटवर शेअर केली आहेत. गांधी नुकतेच आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. तिथं त्यांनी हमालांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या होत्या. याशिवाय त्यांनी काही दिवसांपूर्वी आझादपूर मंडईतील भाजी विक्रेत्यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजी विक्रेत्याशी संवाद साधत त्यांच्याशी चर्चा केली होती.

  • दिल्ली के कीर्तिनगर स्थित एशिया के सबसे बड़े फर्नीचर मार्केट जाकर आज बढ़ई भाइयों से मुलाकात की।

    ये मेहनती होने के साथ ही कमाल के कलाकार भी हैं - मज़बूती और खुबसूरती तराशने में माहिर!

    काफ़ी बातें हुई, थोड़ा उनके हुनर को जाना और थोड़ा सीखने की कोशिश की। pic.twitter.com/ceNGDWKTR8

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केट : राहुल गांधी यांनी एक्स या सोशल साईटवर लिहलं आहे की, 'आज मी दिल्लीतील कीर्तीनगर येथील आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये गेलो होतो. तिथं मी कारागिरांना भेटलो. कारागिर मेहनती असण्यासोबतच अप्रतिम कलाकार देखील आहेत. मी त्यांच्याशी कामाबाबत माहिती घेतली. मी त्यांच्याशी कौशल्याबद्दल जाणून घेतलं, तसंच थोडं शिकण्याचा प्रयत्न देखली केला.

  • दिल्ली के कीर्तिनगर स्थित एशिया के सबसे बड़े फर्नीचर मार्केट पहुंचे जननायक @RahulGandhi जी।

    वहां उन्होंने बढ़ई भाइयों से मुलाकात कर उनकी समस्याएं सुनीं और उनके हुनर को करीब से जानने और समझने की कोशिश की।

    'भारत जोड़ो यात्रा' जारी है... pic.twitter.com/Pxzn3GZzBP

    — Congress (@INCIndia) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बाजारपेठेत अनेक वैशिष्ट्ये : दिल्लीचे कीर्ती नगर फर्निचर मार्केट हे आशियातील सर्वात मोठे फर्निचर मार्केट आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला किरकोळ, घाऊक विक्रेत्यांसोबतच प्रत्येक गरजेच्या वस्तू मिळतील. येथे बनवलेले फर्निचर युरोपीय देशांबरोबरच नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तानमध्ये जातं. 80 च्या दशकात स्थापन झालेल्या या बाजारपेठेत अनेक वैशिष्ट्ये आहेत.

डिझाइन्स, अनेक व्हरायटी : यामुळंच दिल्ली तसंच देशातील विविध राज्यांतून लोक फर्निचर खरेदीसाठी कीर्ती नगर मार्केटमध्ये येतात. इथं केवळ फर्निचर, सजावटीच्या वस्तूंचं शोरूम नाही तर त्याचं उत्पादनाचे युनिट देखील आहे. यामुळं येथे लोकांना मोठ्या प्रमाणात डिझाइन्स, व्हरायटी मिळतात. ज्याला बजेटमध्ये माल घ्यायचा आहे, तो येथे उपलब्ध आहे, असल्याचं राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे.

हेही वाचा -

  1. Notice to Rohit Pawar : दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून मला नोटीस, रोहीत पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
  2. Swaminathan Passed Away: भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद स्वामीनाथान यांनी व्रत म्हणून सांभाळले-एकनाथ शिंदे
  3. Mathura Train Accident : ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढण्याआधी लोको पायलटचा सुरू होता व्हिडिओ कॉल, पाच जण निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.