नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाचा वाढता संसर्ग, लसीचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. राहुल गांधींनी सोमवारी टि्वट करत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असेलल्या केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. उत्सव, टाळ्या-थाळ्या खूप झालं. आता देशाला लस द्या आणि इव्हेंटबाजी कमी करा, या आशयाचे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच त्यांनी एक व्हिडिओही जारी केला आहे
३८५ दिवसातही कोरोनाविरोधातील लढाई जिंकता आली नाही. उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या, असं राहुल गांधींनी ट्विट केले आहे.
व्हिडिओमध्ये काय म्हटलं?
कोरोना विरोधातील लढाई 18 दिवसांत जिंकली जाईल, असे मोदी म्हणाले होते. तुम्ही टाळ्या- थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाइलचा लाईट देखील लावायला लावला. मात्र, करोना वाढतच गेला आहे. आता दुसरी लाट आहे आणि लाखो लोकं कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी लस उपलब्ध करा. लसीची निर्यात बंद करा आणि गरीब बांधवांना उत्पन्नासाठी मदत करा, असे राहुल गांधींनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
कोरोनाचा प्रसार होऊन एक वर्ष उलटले -
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जनता कर्फ्यूच्या टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या सांगितल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी आत्मविश्वास येईल आणि कोरोना विरोधातील लढाईला बळकटी मिळेल, असा त्यांचा उद्देश होता. कोरोनाचा प्रसार होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र, अद्याप कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. रुग्णांची संख्या वाढल्याने लसीचा तुडवडा निर्माण झाला. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेग कमी झाला आहे. याचाच संदर्भ देत आज राहुल गांधींनी टि्वट करत मोदींवर टीका केली.
हेही वाचा - 'आयएनएस विराट' मोडीत; संग्रहालयात रुपांतराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली