खंडवा(मध्य प्रदेश) - हिजाबवरून मध्य प्रदेशात राजकारण तापले (Hijab controversy) आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh in Khandwa) यांनी हिजाबच्या वादावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजपकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही, फक्त हिंदू-मुस्लीम आणि हिंदुस्थान-पाकिस्तान करत राहतात. कशाचा हिशोब केंद्र सरकार देत नाही. तसेच यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती चांगली असल्याचेही दिग्विजय सिंह म्हणाले.
हेही वाचा -मिथून चक्रवर्ती यांच्या भाजपा प्रवेशावर दिग्विजय सिंह यांची टीका
- काँग्रेसचे सरकार असते तर शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ झाले असते -
दिग्विजय सिंह हे खरगोन येथून बुराहानपूरला जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते अरुण यादव देखील होते. यावेळी बोलताना दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले मध्ये प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असते तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असते. काँग्रेसमधून तिकीटावर जिंकून आल्यावर व नंतर भाजपात गेलेल्यांना देखील सिंह यांनी खडेबोल सुनावले आहेत. यांच्यामुळेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊ शकले नाही. तसेच राज्यात दारुबंदी करण्याची मागणी उमा भारती यांनी केली होती. या मागणीकडे देखील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लक्ष द्यावे, अशी विनंती दिग्विजय सिंह यांनी केली.