ETV Bharat / bharat

नक्षली हल्ला : काँग्रेसकडून गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी

author img

By

Published : Apr 5, 2021, 7:40 PM IST

नक्षली हल्ला प्रकरणी काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यानाम्याची मागणी केली. काँग्रेसेच प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

नक्षली हल्ला
नक्षली हल्ला

नवी दिल्ली - छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेने देश हादरला. तर एक जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यानाम्याची मागणी केली. गृहमंत्री बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचे काँग्रेसने म्हटलं. काँग्रेसेच प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

जेव्हापासून अमित शाह देशाचे गृहमंत्री झाले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 5 हजार 213 नक्षली हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात 416 जवानांना विरमरण आलय. यासंदर्भाती माहिती सरकारने संसदेत दिली होती, असे सुरजेवाला म्हणाले.

चकमकीची घटना 3 एप्रिलला जवळपास 11.30 वाजता झाली. घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही देशाच्या गृहमंत्र्याची प्रतिक्रिया आली नव्हती. जेव्हा ही चकमक सुरू होती. तेव्हा आपले गृहमंत्री तामिळनाडू रोड शो करत होते. त्यानंतर ते दिल्ली किंवा छत्तीसगढला गेले नाही. तर ते केरळकडे रवाना झाले. तिथे त्यांनी पुन्हा दोन प्रचार सभा घेतल्या. त्यानंतर पुन्हा आसामकडे गेले आणि शेवटच्या दोन सभा न घेता देशावर उपकार केले. देशाचा गृहमंत्री इतका लाचार असू शकतो का. नक्षलवाद्यांशी लढणे गृहमंत्र्याची जबाबदारी आहे, असे सुरजेवाला म्हणाले.

मुंबई हल्ल्यावेळी जेव्हा एका गृहमंत्र्याने कपडे बदलले होते. तेव्हा त्यांचा राजीनामा मागितला होता. आता अमित शाह यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार आहे का, देशात आतापर्यंत एकाही गृहमंत्र्याने अशी कृती केलेली नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

हेही वाचा - बीजापूर हल्ल्यात नक्षलवाद्यांनी जम्मू-काश्मिरच्या जवानाला ठेवले ओलीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.