ETV Bharat / bharat

Prashant Kishor Role in Congress : प्रशांत किशोर यांच्यावर काय असणार जबाबदारी; दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत खलबते सुरू - प्रशांत किशोर यांच्यावर काय असणार जबाबदारी

काँग्रेस समितीच्या अंतिम बैठकीत विविध मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे. गेल्या आठवडाभरात, प्रशांत किशोर यांना सामील करण्यावर व्यापक एकमत झाले ( congress meeting on Prashant Kishor ) आहे. परंतु नेमकी भूमिका आणि जबाबदारी काय द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांच्यावर ( Sonia Gandhi responsibility ) सोपविण्यात आली आहे.

Sonia Gandhi Prashant Gandhi
सोनिया गांधी प्रशांत किशोर
author img

By

Published : Apr 25, 2022, 3:28 PM IST

नवी दिल्ली - निवडणूक रणनीतीतज्ज्ञ ( poll manager Prashant Kishor ) प्रशांत किशोर यांची काँग्रेसमधील पक्षाची भूमिका काय, असावी याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेवर गेल्या आठवडाभरात वरिष्ठ नेत्यांच्या निवडक ( Prashant Kishor role in congress ) प्रशांत किशोर गटाने चर्चा केली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी ए.के .अँटनी, पी चिदंबरम, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अंबिका सोनी, जयराम रमेश, दिग्विजय सिंग आणि रणदीप सिंग सुरजेवाला व प्रियांका गांधी वड्रा यांचा समावेश असलेल्या समितीसोबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ( congress committee meeting in Delhi ) विचारविनिमय सुरू केला.

काँग्रेस समितीच्या अंतिम बैठकीत विविध मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे. गेल्या आठवडाभरात, प्रशांत किशोर यांना सामील करण्यावर व्यापक एकमत झाले ( congress meeting on Prashant Kishor ) आहे. परंतु नेमकी भूमिका आणि जबाबदारी काय द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांच्यावर ( Sonia Gandhi responsibility ) सोपविण्यात आली आहे.

प्रादेशिक पक्षांशी संबंध तोडण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी-काँग्रेस प्रमुखांच्या निवासस्थानी बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. रावदेखील आहे. प्रशांत किशोर यांची पॉलिटिकल अॅक्शन कमिटी ही केसीआर यांच्यासाठीदेखील निवडणुकीत प्रचाराचे काम करत आहे. प्रशांत किशोर यांचे पीएम मोदी, जेडी-यू, वायएसआर काँग्रेस, डीएमके, आप आणि टीआरएस या प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध आहेत. हे संबंध तोडावेत असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रशांत किशोर यांना सूचविले होते.

आयपॅक निवडणूक रणनीती-विशेष म्हणजे, रविवारी प्रशांत किशोर यांच्या आयपीएसी ( IPAC TRS join for poll ) ) कंपनीने टीआरएसशी हातमिळवणी केली आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही आयपीएसी टीएमसीबरोबर काम करत ( IPAC with TMC ) आहे. 2021 च्या राज्य निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे किशोर यांनी कामातून विश्रांती घेत असल्याचे जाहीर केले होते.

गांधी घराण्याबाहेरील पक्षप्रमुख होणार का?प्रत्यक्षात तृणमूलने त्रिपुरा आणि गोवा विधानसभा निवडणुकांसाठी तसेच 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांसाठी IPAC सोबत करारावर स्वाक्षरी केली. प्रशांत किशोर यांनी सादर केलेल्या बहुतेक प्रस्तावांना काँग्रेसच्या दिग्गजांनी अनुकूलता दर्शविली आहे. पक्षप्रमुख म्हणून गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीचे निवड करण्यासारख्या संवेदनशील विषयावर काँग्रेस काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पक्षाच्या रचनेत आमूलाग्र सुधारणा करताना प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे सोपे राहणार नाही. यावर प्रशांत किशोर पक्षाला काय मार्ग दाखवितात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा-राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधकांचे उमेदवार..?

हेही वाचा-शरद पवार-प्रशांत किशोर भेटीवर गोपीचंद पडळकरांची टीका, म्हणाले....

हेही वाचा-प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश...राजस्थानच्या महसूल मंत्र्यांचे स्पष्ट संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.