ETV Bharat / bharat

Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये यंदा कॉंग्रेसच्या 'सायलेंट कॅंपेनची' कसोटी - silent campaign

काँग्रेसने यंदा गुजरात निवडणुकीत कुठलाही गाजावाजा न करता प्रचार केला. घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या काँग्रेसने मतदानाच्या दिवशी मतदानावर देखरेख ठेवण्यासाठी बूथ-स्तरीय निरीक्षक तैनात केले आहेत. 2017 च्या निवडणुकीत भाजपला कडवा लढा देऊनही पक्ष विजय खेचून आणण्यात अपयशी ठरला होता. यंदा पक्षाचे यश आदिवासीबहुल दक्षिण गुजरात सारख्या प्रदेशातील कामगिरीवर अवलंबून आहे, असे ETV भारतचे अमित अग्निहोत्री (Amit Agnihotri ETV) लिहितात.

Gujarat Elections 2022
Gujarat Elections 2022
author img

By

Published : Nov 30, 2022, 5:59 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेसने यंदा गुजरात निवडणुकीत (Gujarat Elections 2022) कुठलाही गाजावाजा न करता प्रचार केला. (Congress silent campaign Gujarat). पक्षाने पक्ष निरीक्षकांना 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असलेल्या 182 पैकी 89 विधानसभा जागांवरील बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. "आम्ही निरीक्षकांना फक्त बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. त्यांनी बाकी सर्व विसरून जावे," असे कॉंग्रेसचे गुजरात प्रभारी सचिव बीएम संदीप कुमार यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. ते राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाने नियुक्त केलेल्या एआयसीसी आणि राज्यस्तरीय निरीक्षकांच्या संचाचा संदर्भ देत होते.

मोठमोठ्या रॅलींपेक्षा मतदार जोडण्यावर भर : हे निरीक्षक पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून स्थापन केलेल्या बूथ-स्तरीय पथकांसह मतदान केंद्रांचे व्यवस्थापन करतील. पहिल्या टप्प्यातील 89 पैकी बहुतेक जागा सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात प्रदेशातील आहेत. तर उत्तर आणि मध्य गुजरातमधील उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. “आम्ही यावेळी नवीन रणनीती स्वीकारली आहे. प्रत्येक बूथ स्तरावर संघ तयार करण्यात आले आहेत. पक्षाने मोठमोठ्या रॅलींपेक्षा मतदार जोडण्यावर जास्त भर दिला आहे. गेल्या काही महिन्यांत आमचे कार्यकर्ते राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचले आहेत,” असे ज्येष्ठ राज्य युनिट नेते सिद्धार्थ पटेल म्हणाले. कॉंग्रेसमधील सूत्रांनुसार, मतदार जोडण्यावर लक्ष केंद्रित करणारी ही मोहीम 2017 च्या निवडणूक प्रचारादरम्यानची उणीव भरून काढण्यासाठी सुरू करण्यात आली होती. 2017 मध्ये पक्षाने सत्ताधारी भाजपला कडवे आव्हान दिले होते, परंतु ते सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले होते.

लोकांना बदल हवा आहे : “जनतेची प्रतिक्रिया सकारात्मक आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात जाहीरपणे बोलण्याची मतदारांना भीती वाटत असली तरी उद्या मतदानातून ते व्यक्त होतील. आमची बूथ-स्तरीय टीम जास्तीत जास्त मतदान होईल याची खात्री करतील,” असे पटेल म्हणाले. पक्षातील रणनीतीकारांच्या मते, अशा प्रकारच्या प्रचार मोहिमेने पक्षाला संसाधने वाचविण्यास मदत झाली, जी अनेक पक्ष मोठ्या रॅली आणि आक्रमक प्रचारात खर्च करतात. “आम्ही तळागाळात काम करत आहोत. आता लोकांना खरोखर बदल हवा आहे. हे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा बडोद्यात आले पण त्यांना रॅली करता आली नाही. कॉंग्रेसच्या गुजरात प्रभारी सचिव उषा नायडू यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, राज्यात भाजपच्या अनेक अशा रॅल्या झाल्यात जिथे लोकंच आले नाहीत.

दक्षिण गुजरातमध्ये चांगली कामगिरी करू : 1 डिसेंबर रोजी होणार्‍या पहिल्या टप्प्यातील मतदानाची 2017 च्या निवडणुकांशी तुलना करताना कॉंग्रेसच्या रणनीतीकारांनी सांगितले की, गेल्या वेळी पक्षाने सौराष्ट्रात चांगली कामगिरी केली होती. परंतु दक्षिण गुजरात भागात पक्ष तितकी चांगली कामगिरी करू शकला नाही. येथे अनेक आदिवासीबहुल मतदारसंघ आहेत. राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या दोघांनीही तेथे रॅलींना संबोधित केले. यंदा पक्ष व्यवस्थापकांचे लक्ष दक्षिण गुजरात भागांवर केंद्रित झाले आहे. “खरगे यांच्या नुकत्याच झालेल्या मेहसाणा येथील रॅलीत आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आल्याने आम्हाला लोकांसाठी खुर्च्या लावण्यात अडचण झाली. यावेळी आम्ही दक्षिण गुजरातमध्ये चांगली कामगिरी करू”, असे पटेल म्हणाले. गेल्या 27 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेससाठी गुजरातची निवडणूक महत्त्वाची आहे. तरीही गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानात सत्ताधारी भाजपचा प्रभाव पडू शकतो, अशी भीती कॉंग्रेसला आहे. त्यानुसार राज्यातील निरीक्षकच नव्हे तर दिल्लीतील पक्षाचे पदाधिकारीही १ डिसेंबरला हाय अलर्टवर असतील.

खरगेंच्या नेतृतत्वाखालीच निवडणुका : कॉंग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रघु शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमसोबतच राजस्थानचे मुख्यमंत्री व विशेष निरीक्षक अशोक गेहलोत गुरुवारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. गेल्या काही दिवसांपासून गेहलोत यांनी राज्यात आक्रमक प्रचार केला आहे. 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये असलेले खरगे यांनाही नियमित फीडबॅक दिला जाईल, असे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. जरी खरगे यांनी 26 ऑक्टोबर रोजीच पक्षप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला असला, तरी त्यांच्या नेतृत्त्वातच हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका होतील, असे ते म्हणाले.

निकाल आश्चर्यकारक असतील : "भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे. त्यांच्या प्रभावाखाली काही वृत्तवाहिन्यांनी नुकतेच कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात ओपिनियन पोल चालवले आहेत. जेव्हा लोक रागावलेले असतात तेव्हा त्यांचे समर्थन गोळा करणे आपले कर्तव्य आहे. आमच्याकडे आमची स्वतःची रणनीती आहे. परंतु आम्ही ती सामायिक करू शकत नाही”, असे पटेल म्हणाले. उषा नायडू म्हणाल्या की, 8 डिसेंबरचे निकाल आश्चर्यकारक असतील. यापूर्वी, कॉंग्रेसचे प्रभारी रघु शर्मा यांनी सार्वजनिक निधीचा वापर केला जात असल्याचा आरोप केला होता. मतदानाच्या एक दिवस अगोदर गुजरातमधील मॉडेल पोल कोडच्या कथित उल्लंघनाबद्दल बुधवारी पक्षाने निवडणूक आयोगाशी संपर्क साधला, असे सूत्रांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.