ETV Bharat / bharat

मुझफ्फरपूरच्या MDDM कॉलेजमध्ये हिजाबवरून गोंधळ; आम्हाला देशद्रोही संबोधल्याचा विद्यार्थिनींचा दावा

author img

By

Published : Oct 16, 2022, 9:31 PM IST

हिजाबचा वाद बिहारपर्यंत पोहोचला. मुझफ्फरपूरमध्ये रविवारी महंत दर्शनदास महिला महाविद्यालय (MDDM) कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून प्रचंड गोंधळ झाला. (Uproar over Hijab in MDDM College) इंटरसेंटअपची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींची चौकशी केल्यानंतर हा वाद झाला.

महंत दर्शनदास महिला महाविद्यालय
महंत दर्शनदास महिला महाविद्यालय

मुजफ्फरपुर (बिहार) - हिजाबचा वाद आता बिहारपर्यंत पोहोचला आहे. मुझफ्फरपूरमधील महंत दर्शनदास महिला महाविद्यालय (MDDM) कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून रविवारी (दि. 16 ऑक्टोबर)रोजी गदारोळ झाला. इंटरसेंट अपची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींची चौकशी केल्यानंतर हा वाद झाला. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार आम्हाला देशद्रोही संबोधण्यात आले. तसेच, हिजाब काढून फेकून देण्याचे आदेश देण्यात आले. त्याचवेळी मुख्याध्यापकांनी हे वातावरण बिघडवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे.

शहरातील एमडीडीएम कॉलेजमध्ये रविवारी हिजाब घालण्यावरून जोरदार वाद झाला. इंटर-सेंटअप परीक्षेला बसण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींनी देशविरोधी बोलल्याचा आणि हिजाब काढल्याच्या आदेशावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळाची माहिती मिळताच मिठणपुरा ठाणेदार श्रीकांत प्रसाद सिन्हा महिला जवानांसह घटनास्थळी पोहोचले. विद्यार्थिनींना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांचीही पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यावरून बरीच वादावादी झाली. काही वेळाने कॉलेजच्या प्राचार्या डॉ. कनू प्रिया आल्या आणि त्यांनी कसेबसे सर्वांना समजावून सांगितले.

गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितले की, कॉलेजमध्ये सेंटअपची परीक्षा घेतली जात होती. यादरम्यान काही विद्यार्थिनी हिजाब घालून परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. वर्गात जात असताना शिक्षक रवी भूषण यांनी तिला हिजाब काढण्यास सांगितले. विद्यार्थी ब्लूटूथ घेऊन आल्याचा संशय त्यांना आला. तुम्ही लेडी गार्डला बोलावून तपासा, असे विद्यार्थिनींनी सांगितले. काही आक्षेपार्ह साहित्य आढळून आल्यास आम्ही परीक्षा न देताच निघून जाऊ अस विद्यार्थिनी म्हणाल्या. परंतु, आमचे शिक्षकांनी ऐकले नाही असही त्या विरद्यार्थिनींचे मत आहे.

विद्यार्थीनींचे मत आहे की, आम्हाला शिक्षक शशी भूषण यांनी देशद्रोही म्हणले. तसेच, इथे खातात आणि पाकिस्तानचे गातात, असे करायचे असेल त पाकिस्तानलाच जा असही ते म्हणाले, असा दावाही त्या विद्यार्थिनींनी केला आहे. शिक्षक शशी भूषण यांच्या या वक्त्याव्यानंतर विद्यार्थी संतापले आणि परिक्षा न देताच कॉलेजच्या गेटवर आंदेलनाला बसले.

हा सर्व प्रकार म्हणजे वातावरण बिघडवण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कनू प्रिया यांनी दिली आहे. महाविद्यालयाचा इतिहास खूप जुना आहे. हे सगळे इंटरमिजिएटचे विद्यार्थी होते. या लोकांना ब्लूटूथ काढण्यास सांगण्यात आले. पण, त्यांनी तो वेगळा मुद्दा बनवून धर्मावरून वाद घालण्यास सुरुवात केली, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे असही प्राचार्य म्हणाल्या आहेत. या विद्यार्थिनींची उपस्थितीही ७५% पेक्षा कमी आहे. कमी उपस्थिती असणाऱ्यांना अंतिम परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे निर्देश शिक्षणमंत्री आणि विद्यापीठाने दिले आहेत. हे लोक विनाकारण दबाव निर्माण करत आहेत, जेणेकरून कॉलेज प्रशासन त्यांच्यापुढे झुकेल असही त्या म्हणाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.