ETV Bharat / bharat

Complaint Against Kejriwal Kharge : आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केजरीवाल, खरगे यांच्या विरोधात तक्रार दाखल - New Parliament inauguration

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal Mallikarjun Kharge
अरविंद केजरीवाल मल्लिकार्जुन खरगे
author img

By

Published : May 27, 2023, 4:16 PM IST

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद वाढतोच आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे याप्रकरणी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे नव्या वादात सापडले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जातीचा उल्लेख करत भडकाऊ विधाने केल्याबद्दल केजरीवाल, खरगे आणि इतर काही नेत्यांविरोधात नवी दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे तक्रारीत? : तक्रारीत म्हटले आहे की, केजरीवाल आणि खरगे यांनी राजकीय फायद्यासाठी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या आयोजनाबाबत बोलताना दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याची आणि भारत सरकारविरुद्ध अविश्वास निर्माण करणारी विधाने केली आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न करण्याबाबत चार ट्विट करत सरकारला घेरले आहे. मोदी सरकार केवळ निवडणुकीसाठी दलित आणि आदिवासी समाजातून अध्यक्ष बनवते असे दिसते, असे ते म्हणाले आहेत.

संसद भवनाची पायाभरणी झाली तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. आता उद्घाटन कार्यक्रमात द्रौपदी मुर्मूला आमंत्रित करण्यात आलेले नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाच्या प्रथम नागरिक आहेत. त्या एकट्या सरकार आणि विरोधी पक्षाचे तसेच देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले असते तर ते लोकशाही मूल्यांप्रती सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक ठरले असते. - मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस अध्यक्ष

केजरीवाल यांचे ट्विट : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, दलित समाज विचारत आहे की त्यांना अशुभ मानले जाते का, म्हणूनच त्यांना उद्घाटनाला बोलवत नाही. मोदी सरकारवर एससी, एसटीचा अपमान केल्याचा आरोप करत केजरीवाल यांनी ट्विट केले की, राम मंदिराच्या पायाभरणीसाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. तसेच नव्या संसदेच्या पायाभरणी कार्यक्रमालाही त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. नवीन संसद भवनाचे उद्घाटनही विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होत नाही.

हेही वाचा :

  1. New Parliament Building : अशी आहे संसदेची नवी इमारत! पहा Video
  2. Amit Shah : 'काँग्रेस भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा इतका तिरस्कार का करते?', नव्या संसद भवनाच्या वादावरून अमित शाहंचा हल्लाबोल
  3. New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवन उद्घाटन प्रकरणी याचिकाकर्त्याला दणका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.