ETV Bharat / bharat

LPG Cylinder Price Today : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलासा, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती सुमारे 171 रुपयाने स्वस्त - एलपीजी

दिल्लीतील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किमत तब्बल 171.50 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे सिलिंडर किमतीचा मुद्दा आगामी निवडणुकीत चांगलाच गाजणार आहे.

LPG Prices Slashed In Delhi
संग्रिहत छायाचित्र
author img

By

Published : May 1, 2023, 8:21 AM IST

Updated : May 1, 2023, 9:26 AM IST

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आसमान गाठल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच आग लागली आहे. दुसरीकडे घरगुती गॅससह व्यावसायिक गॅसच्या किमतीचे दरही गगणाला भिडले होते. मात्र आता सरकारने व्यावसायिक एलपीजीची किमती तब्बल 171.50 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत सोमवारपासून 1856.50 रुपये झाली आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा : तेल वितरण करणाऱ्या कंपन्यांनी व्यावसायिक गॅसची किंमती कमी केल्याचा मोठा फायदा छोट्या व्यावसायिकांना झाला आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपाती केल्याचे हे परिणाम आहेत. एप्रिलमध्ये तेल विपणन कंपन्यांनी तेलाच्या किमती वाढल्यानंतर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 91.50 रुपये प्रति युनिटने कमी केल्या होत्या.

मार्चमध्ये झाली होती मोठी भाववाढ : देशांतर्गत सिलिंडरची किंमत 1 एप्रिलपासून दिल्लीत 2 हजार 028 रुपये होती. तर मार्चमध्ये 2 हजार 119.5 इतकी होती. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) 1 मार्चला घरगुती सिलिंडरच्या किमती 50 रुपयांनी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 350 रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत दिल्लीत 1 हजार 103 रु होती, तर कोलकातामध्ये 1 हजार 129 रु होती. मुंबईत 1 हजार 112.5 आणि चेन्नईमध्ये 1 हजार 113 रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस सत्तेवर आल्यास 500 रुपयाला मिळणार सिलेंडर : दिल्लीत विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने 2024 मध्ये पक्ष सत्तेवर आल्यास 500 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकराचे इतर प्राधान्य असताना पक्षाचा गरिबांच्या बाजूने फोकस असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले होते. आम्ही 2024 मध्ये सत्तेवर आलो तर काँग्रेस सरकार एलपीजी सिलिंडरची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त होऊ देणार नसल्याची शपथ काँग्रेस नेत्यांनी घेतली होती. 500 रुपयांपेक्षा जास्त किंमत महागाई आणि जीडीपी वाढीसाठी हानिकारक असल्याचेही काँग्रेस प्रवक्ते प्रा. वल्लभ यांनी स्पष्ट केले होते.

आगामी निवडणुकीचा परिणाम : देशात आगामी निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा दावा विरोधी पक्षांतील नेते करत आहेत. दुसरीकडे सध्या कर्नाटकमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सिलिंडरच्या किमती केल्याचा मुद्दा या निवडणुकीतही पेटू शकतो.

हेही वाचा - PM Modi Road Show In Mysore: पंतप्रधान मोदींचा म्हैसूरमध्ये रोड शो! म्हणाले, राज्यातील राजकीय अस्थिरतेसाठी काँग्रेस जबाबदार -पंतप्रधान मोदी

Last Updated : May 1, 2023, 9:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.