ETV Bharat / bharat

Commercial LPG Prices : व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती झाल्या स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Commercial LPG Prices : घरगुती गॅस सिलेंडर पाठोपाठ आता व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे. १९ किलोग्राम व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १५८ रुपयांनी कमी झालीय.

Commercial LPG
सिलेंडर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 10:40 AM IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं २९ ऑगस्टला घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयांनी कपात केली होती. घरगुती गॅस सिलेंडर पाठोपाठ आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही कपात करण्यात आलीय. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्राम व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर १५८ रुपयांनी कमी केला. शुक्रवार, १ सप्टेंबरपासून नवे दर लागू होतील.

घरगुती सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयांनी कपात : यापूर्वी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील महिलांना भेट म्हणून केंद्र सरकारनं घरगुती एलपीजीच्या किमतीत २०० रुपयांनी कपात केली होती. व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी सिलेंडरसाठीच्या दरातील सुधारणा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी जारी होतात. या आधी ऑगस्टमध्ये ओएमसीनं व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ९९.७५ रुपयांनी कमी केली होती. तर जुलैमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात प्रत्येकी सात रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

या आधीही झाली होती कपात : या दरवाढीपूर्वी, या वर्षी मे आणि जूनमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सलग दोन वेळा कपात करण्यात आली होती. मे महिन्यात ओएमसीनं व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १७२ रुपयांनी कमी केली होती. तर जूनमध्ये ८३ रुपयांची कपात करण्यात आली होती. तर एप्रिलमध्येही सिलेंडरच्या किमती ९१.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. पेट्रोलियम आणि तेल विपणन कंपन्यांनी या वर्षी १ मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेडरच्या किंमती ३५०.५० रुपये प्रति युनिट आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती ५० रुपयांनी वाढवल्या होत्या.

महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातील १९ किलो व्यावसायिक सिलेंडरचा दर :

  • मुंबई - १४८२ रुपये
  • पुणे - १५४२ रुपये
  • नागपूर - १७०६ रुपये
  • नाशिक - १५५७ रुपये
  • छ. संभाजीनगर - १५८६ रुपये
  • कोल्हापूर - १५०१ रुपये
  • अमरावती - १६४२ रुपये
  • सोलापूर - १५७३ रुपये

हेही वाचा :

  1. LPG Cylinder Price : गृहिणींसाठी आनंदाची बातमी; सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त
  2. Rule Change From १st September २०२३ : देशात आजपासून 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम
  3. Rules Change from August 2023 : ऑगस्टमधील या मोठ्या बदलांचा तुमच्यावर होईल थेट परिणाम...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.