कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले. आज (गुरुवार) दुपारी १२ वाजताच्या सुमारास, जिल्ह्याच्या सुती भागामध्ये चारचाकी आणि रिक्षात धडक होऊन हा अपघात झाला. यात सुमारे १५ जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओ एका रिक्षाला धडक दिली. यामध्ये सुमारे सात जण जागीच ठार झाले. अपघातात प्राण गमावलेल्यांपैकी दोघांची ओळख पटवण्यात आली आहे. अझफरुल शेख (२४) आणि फिरोज शेख (२६) अशी या दोघांची नावे आहेत. यांपैकी फिरोज हा रिक्षाचालक होता. इतर मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : ममतांवरील हल्ला प्रकरण : तृणमूल आणि भाजपाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट