जयपूर - राजस्थानच्या बर्याच भागात बोचऱ्या थंडीची नोंद झाली आहे. चूरू मधील रात्रीचे तापमान वजा 0.3 अंश सेल्सिअस होते.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील नऊ जिल्हे रविवारपर्यंत शीतलहरीच्या टप्प्यात राहतील. त्यात श्री गंगानगर, हनुमानगड, जैसलमेर, बीकानेर, चूरू, अलवर, भरतपूर, सीकर आणि झुंझुनूचा समावेश आहे.
हेही वाचा - श्रीनगर, जम्मूतील सर्वात थंड रात्र; द्रास येथे तापमानाचा पारा उणे 26.5 अंशांवर
माउंट अबू येथे गुरुवारी पारा वजा खाली उणे 2.5 अंश सेल्सियस पर्यंत खाली आला. सीकर मधील तापमान 1 डिग्री सेल्सियस होते.
राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान पाच अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेले. पिलानी येथे 1.5. अंश, भीलवाडा येथे 2.1 आणि वनस्थली 2.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हेही वाचा - पश्चिम बंगालच्या मिठायांमध्ये मेदिनीपूरच्या 'बाबरशा'ला विशेष स्थान