नवी दिल्ली - यंदा नवरात्रीमध्ये (Navratri 2022 ) चांगला योग जुळून आला आहे. त्यामुळे यावर्षीचा दुर्गोत्सव ( Navratri Festival ) एक असाधारण रित्या साजरा होत आहे. यंदा षष्टि, सप्तमी, अष्टमी,नवमी व विजया दशमीचा ( Dussehra ) योगायोग त्यांच्या तारखानुसार जुळून आला आहे. नीट पाहिल्यास त्यांच्या तारखांची, महिन्यांची आणि वर्षांची बेरीज केल्यास जो क्रमांक तयार होतो त्या दिवशी ते सण येतात.
तारखानुसार योद जुळला - षष्टि ही 01-10-22 ला आली आहे. म्हणजेच तारखेतला एक एक क्रमांक घेऊन 0+1+1+0+2+2 यांची बेरीज केल्यास तो 6 येतो. 6ला षष्ठी आहे. महासप्तमी ही 02-10-22 या तारखेला आली आहे. म्हणजेच तारखेतला एक एक क्रमांक घेऊन 0+2+1+0+2+2 यांची बेरीज केल्यास तो 7 येतो . 7ला महासप्तमी आहे. अष्टमी ही 03-10-22 या तारखेला आली आहे. म्हणजेच तारखेतला एक एक क्रमांक घेऊन 0+3+1+0+2+2 यांची बेरीज केल्यास तो 8 येतो. 8महा अष्टमी आहे. तसेच 9 ला महा नवमी आणि 10 ला विजया दशमी ( Vijayadashami ) आहे.
नवरात्रोत्सव साजरा - अनेक ठिकाणी नवरात्री जल्लोषात साजरी केली जात आहे. गरबा, दांडीया, डिजे डान्सचे आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये खेरदीची लगभग सुरू आहे. विविध खाद्य पदार्थांच्या बाजारपेठा सजल्या आहे. यंदाच्या नवरात्रीत चांगले योग आले आहेत. त्यामुळे यंदाचा दुर्गोत्सव विशेष मानला जात आहे. या वर्षी षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, विजया दशमी (दशेरा) त्यांच्या तिथींनुसार जुळून आली आहेत. नीट पाहिल्यास, त्यांच्या तारखा, महिने आणि वर्षे जोडून तयार केलेली संख्या म्हणजे सण ज्या दिवशी येतात.