गुजरात : भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) गुजरात एटीएससोबत केलेल्या संयुक्त कारवाईत शनिवारी पहाटे आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ अल सक्कर नावाची पाकिस्तानी बोट सहा क्रू मेंबर्स आणि 350 कोटी रुपयांचे 50 किलो हेरॉइनसह ( 50 kg of Heroin ) पकडले. (IMBL), (Indian Coast Guard) ICG अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तपासासाठी बोट जखाऊ येथे आणण्यात येत असल्याचे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या एका वर्षात ICG ची ATS सोबत केलेली ही सहावी कारवाई आहे, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी घटना आहे.
या हेरॉईनची अंदाजे किंमत सुमारे 350 कोटी रुपये आहे. एवढेच नाही, तर ICG आणि गुजरात ATS ने बोटीवरील 6 जणांना अटकही केलीय. पुढील तपासासाठी ही बोट जखाऊ बंदरात आणण्यात येत आहे. खराब हवामानानंतरही गुजरात एटीएससह आयसीजीनं हे मिशन पूर्ण केल्याचं सांगितले जात आहे. ही बोट आणि ड्रग्जशी संबंधित अधिक माहितीसाठी एजन्सीनं तपास सुरू केला आहे.गेल्या एका वर्षात ICG ची ATS सोबतची ही सहावी कारवाई आहे. तर, ICG नं ड्रग्जने भरलेली बोट पकडण्याची एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे 200 कोटी रुपयांचं 40 किलो हेरॉईन एफएम पकडण्यात आलं होतं. एवढेच नाही, तर यादरम्यान 6 जणांना अटक करण्यात आली, जे पाकिस्तानी असल्याचं सांगण्यात आल आहे. कोचीमध्ये यापूर्वी NCB आणि ICG नं मिळून एक पाकिस्तानी बोट पकडली होती, त्यामध्ये करोडोंचे ड्रग्ज सापडले होते.