नवी दिल्ली: पत्रकार आणि ऑल्ट न्यूज या फॅक्ट चेक वेबसाइटचे संस्थापक मोहम्मद जुबेर यांनी पोलीस कोठडी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात उद्या म्हणजेच १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. 28 जून रोजी पटियाला हाऊस कोर्टाने झुबेरच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली होती. जुबेरला २७ जून रोजी अटक करण्यात आली होती. जुबेरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेरला २७ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर 27 जूनच्या संध्याकाळी जुबेरला अटक करण्यात आली. त्यानंतर रात्रीच बुरारी येथील दंडाधिकार्यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. तेथे दंडाधिकार्यांनी एक दिवसाची पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.