ETV Bharat / bharat

Countrys first drone manufacturing unit: देशातील पहिले ड्रोन उत्पादन केंद्र रुरकीत सुरू - देशातील पहिले ड्रोन उत्पादन केंद्र

रुरकीमध्ये ड्रोन निर्मिती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्येही आता त्यामुळे ड्रोन तयार होतील. या केंद्राचा शुभारंभ मुख्यमंत्री धामी यांनी केला. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत हे युनिट रोटर प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने सुरू केले आहे.

देशातील पहिले ड्रोन उत्पादन केंद्र रुरकीत सुरू

author img

By

Published : Jul 8, 2022, 4:12 PM IST

रुरकी : भारतात उत्तराखंडमध्येही आता ड्रोन बनवता येणार आहेत. यासाठी रुरकीच्या रामनगरमध्ये ड्रोन निर्मिती केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीने दोन ड्रोनही लाँच केले. ही कंपनी ड्रोनच्या माध्यमातून मॅपिंगचे कामही करते. त्याचबरोबर कंपनीत 100 अभियंत्यांची गरज आहे. ज्यामध्ये उत्तराखंडमधील तरुणांना प्राधान्य दिले जाईल.

देशातील पहिले ड्रोन उत्पादन केंद्र सुरू

उज्वल भविष्याचे तंत्रज्ञान - मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, रुरकीमध्ये देशातील सर्वात मोठी आणि पहिली ड्रोन कंपनी सुरू झाल्याचा आनंद आहे. कंपनी केवळ ड्रोन तंत्रज्ञानामध्ये भारताचे भविष्य उज्वल करत नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. ते म्हणाले की, आजच्या काळात ड्रोन खूप उपयुक्त आहेत. कोरोनाच्या काळातही ड्रोनच्या मदतीने गरजूंपर्यंत औषधे पोहोचवण्यात मदत झाली. स्वत: पंतप्रधान मोदीही केदार घाटीमध्ये सुरू असलेल्या बांधकामांचा ड्रोनद्वारे दर महिन्याला आढावा घेतात.

उत्तराखंडमधील आपत्तीच्या वेळी ड्रोन उपयुक्त ठरतील: मुख्यमंत्री धामी म्हणाले की, उत्तराखंडमधील आपत्तीच्यावेळी बचाव कार्यात ड्रोन महत्त्वपूर्ण ठरतील. विमाने बनवण्यात भारत शतकानुशतके पुढे आहे. आपल्या वेदांमध्ये विमान तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे. रामायणातही पुष्पक विमानाचा उल्लेख आहे. या कंपनीतून नवी क्रांती घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच तरुणांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होणार आहे.

कंपनीची कारकीर्द - कंपनीचे मालक साजिद अन्सारी यांनी कंपनीच्या कामगिरीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की कंपनीची स्थापना 1936 मध्ये झाली होती. कंपनी आता जगातील विविध देशांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी एक मोठे साम्राज्य म्हणून प्रस्थापित होत आहे. त्यांनी सांगितले की त्यांची कंपनी प्रामुख्याने ड्रोनद्वारे मॅपिंगचे काम करते. उत्तराखंडमधील या प्रकल्पावर कंपनी 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कंपनीला 100 अभियंत्यांची गरज आहे: रोटर प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक साजिद अन्सारी म्हणाले की, सध्या सुमारे 150 अभियंते त्यांच्यासोबत काम करत आहेत. आता कंपनीला आणखी 100 अभियंत्यांची गरज आहे. ते म्हणाले की, उत्तराखंडमधील तरुणांना प्राधान्य दिले जाईल. अशा परिस्थितीत रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे.

हेही वाचा - Lalu Prasad Yadav: राहुल गांधींनी लालू प्रसाद यादव यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली; तब्येतीची केली चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.