ETV Bharat / bharat

CM On Udaipur Murder: कट्टरपंथी घटकाशी संबंध असल्याशिवाय अशी घटना घडू शकत नाही - गेहलोत

जोधपूर दौरा रद्द करून जयपूरला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उदयपूर हत्याकांड हा कट असल्याचे म्हटले आहे. उदयपूर शहरात भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव (राजस्थानमध्ये कलम 144 लागू) पाहता राजस्थान सरकारने राज्यभरात 24 तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत (Section 144 imposed in Rajasthan). यासोबतच कलम 144 30 दिवस लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

उदयपूर हत्येप्रकरणी सीएम गेहलोत यांचा जयपूरमध्ये सभेसाठी जोधपूर दौरा रद्द

author img

By

Published : Jun 29, 2022, 12:10 PM IST

जोधपूर - मुख्यमंत्री अशोक गेहलोत बुधवारी जोधपूर दौरा रद्द करून जयपूरला रवाना झाले (CM On Udaipur Murder). जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी उदयपूर हत्याकांडाशी (CM Says its a Conspiracy) विदेशी संबंध नाकारले नाहीत. गेहलोत म्हणाले की, ही घटना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय संबंधांशिवाय घडू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. गेहलोत यांनी या घटनेचा थेट दहशतवादाशी संबंध जोडला नाही, परंतु कट्टरपंथी घटकाचा संबंध असल्याशिवाय हे घडू शकले नसते, असे ते म्हणाले.

कट्टरपंथी घटकाशी संबंध असल्याशिवाय अशी घटना घडू शकत नाही - गेहलोत

कन्हैयालालच्या हत्येला मुख्यमंत्र्यांनी घृणास्पद घटना म्हटले आहे. त्यांनी म्हंटले आहे की त्याची जितकी निंदा करावी तितकी कमी आहे (Udaipur Murder A conspiracy). तसेच या हत्येबाबत एसआयटी स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मुख्यमंत्री तीन दिवसांच्या दौऱ्यावर जोधपूरला आले होते. परंतु उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या निर्घृण हत्येनंतर उद्भवलेल्या परिस्थितीनंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला. याआधी मंगळवारी रात्रीही त्यांनी सर्किट हाऊसमध्ये रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

मंगळवार, 28 जून रोजी शिंपी कन्हैयालाल यांच्या दुकानात मोजमाप करण्याच्या बहाण्याने घुसलेल्या बदमाशांनी धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला. मृताने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाजूने पोस्ट टाकली होती. त्यानंतर हे दोघे त्याला सतत धमक्या देत होते. कन्हैयालालने पूर्वी भीतीपोटी दुकानही उघडले नव्हते, मात्र मंगळवारी दुकान उघडताच त्याची हत्या करण्यात आली.

हेही वाचा - उदयपूरच्या कन्हैयालालची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना बेड्या, 13 किलोमीटर पाठलाग करुन पोलिसांनी पकडले

हेही वाचा - Udaipur Murder : राजस्थानमध्ये 24 तास इंटरनेट बंद, 30 दिवसांसाठी कलम 144 लागू.. तपासासाठी एसआयटी स्थापन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.