ETV Bharat / bharat

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी अयोध्या भगवीमय; शहरभर लागले बॅनर्स!

author img

By

Published : Apr 7, 2023, 10:24 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्येत रामललाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

Eknath Shinde Ayodhya Visit
एकनाथ शिंदे अयोध्या दौरा

संपूर्ण शहर जाहिरात फलकांनी गजबजले

अयोध्या (उत्तर प्रदेश) : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच राम नगरी अयोध्येला जाणार आहेत. आगमनापूर्वी येथे त्यांच्या भव्य स्वागताची तयारी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण अयोध्या नगरी भगवी झाली आहे. संपूर्ण शहर जाहिरात फलकांनी गजबजले आहे.

मुख्यमंत्री म्हणून प्रथमच अयोध्येला जाणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अयोध्येच्या रामकथा पार्क हेलिपॅडवर पोहोचतील. यानंतर शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते 11.45 वाजता हॉटेल पंचशील येथे पोहोचतील. येथून काही वेळाने सर्वजण रामजन्मभूमी संकुलाकडे रवाना होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच रामललाच्या दरबारात हजेरी लावत आहेत.

मुख्यमंत्री शरयू नदीची आरती करतील : मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदे दुपारी 12 वाजता प्रभू राम लल्लाच्या आरतीला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1.30 वाजता एकनाथ शिंदे राम मंदिर उभारणीच्या कामाची प्रगती पाहतील. दुपारी अडीच वाजता पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे दुपारी साडेतीन वाजता अयोध्येतील लक्ष्मण किल्ला संकुलात साधू - मुनींची भेट घेऊन सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे शरयू नदीच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी सायंकाळी 6 वाजता आरतीस्थळी पोहोचतील. त्यानंतर सायंकाळी 7.05 वाजता एकनाथ शिंदे रस्तेमार्गाने लखनौला रवाना होतील.

संत आणि धर्मगुरूंचेही आशीर्वाद घेतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुमारे 9 तास अयोध्येत राहणार आहेत. शिंदेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जय्यत तयारी केली गेली आहे. अयोध्येतील प्रसिद्ध सिद्धपीठ संकट मोचन हनुमान गड मंदिराचे पीठाधीश्वर महंत परशुरामदास महाराज त्यांचे स्वागत करतील. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला येत आहेत. त्यांचे स्वागत करून संत त्यांना आशीर्वाद देतील. एकनाथ शिंदे यांचे अयोध्येशी अतूट नाते आहे. ते अयोध्येत येतील आणि रामललाचे दर्शन घेतल्यानंतर संत आणि धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतील. महंत परशुराम दास यांनी सांगितले की, 'ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे राम नगरीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे'.

हे ही वाचा : CM Flags Off Special Train to Ayodhya : एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा, ठाण्याहून तीन हजार शिवसैनिक अयोध्येला रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.