नवी दिल्ली - कोरोना संसर्गामुळे दिल्लीतील परिस्थिती खालावत आहे. संसर्गाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवार व रविवारी कर्फ्यूची घोषणा केली. त्यानुसार कर्फ्यू शुक्रवारी रात्री दहा वाजता सुरू होईल व सोमवारी पहाटे पाच वाजता संपेल. या विकेंड लॉकडाऊनमध्ये अनेक निर्बंध लागू होतील. उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर शनिवार व रविवारच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. बहुतेक लोक सोमवार ते शुक्रवार या काळात काम करतात. त्यामुळे केवळ शनिवार व रविवारी कर्फ्यू लावण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.
बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार कडक कारवाई करेल. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात पूर्ण जोमाने कारवाई केली जाईल. मास्क न घालता घर सोडू नका, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. मास्कचा वापर न केल्यास स्व:तासह कुटुंबीयांना आणि जवळच्या लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका असू शकतो, असेही ते म्हणाले.
काय बंद आणि काय सुरू...
- शनिवार व रविवारी कर्फ्यू
- सिनेमा हॉल 30 टक्के क्षमतेसह सुरू राहतील.
- शनिवार व रविवारच्या कर्फ्यू दरम्यान आवश्यक सेवा विस्कळीत होणार नाहीत.
- अत्यावश्यक सेवा विनामूल्य असतील, लग्नासाठी ई-पास दिले जातील.
- जिम, स्पा आणि सभागृह बंद राहतील.
- खासगी डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचार्यांनाही ओळखपत्र दाखविल्यावर सूट.
- पत्रकारांना सूट मिळेल (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम दोन्ही)
- रेशन, किराणा, फळ, भाजीपाला, दूध, औषधाशी संबंधित दुकानदारांना केवळ ई-पासद्वारे परवानगी दिली जाईल.
- लोकांना रेस्टॉरंट्समध्ये बसून जेवण करता येणार नाही. फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी
30 एप्रिलपर्यंत दिल्लीत नाईट कर्फ्यू -
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी उपराज्यपालांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिल्ली सरकारने घेतल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या खाटांची कमतरता नाही. दिल्लीत 5000 हून अधिक खाट रिकाम्या आहेत. ते प्रत्येक आजारी व्यक्तीला कोणत्याही किंमतीत दिल्लीत बेड मिळायला हवा. निवडीच्या रूग्णालयाचा हट्टीपणा चालणार नाही. जेथे रिक्त बेड असतील तेथे रुग्णाला जावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, 30 एप्रिलपर्यंत दिल्लीत नाईट कर्फ्यूदेखील आहे. त्या अंतर्गत रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कामकाज आणि व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा - 'वैद्यकीय सुविधांचा अभवा असताना लस उत्सव साजरा करणे हे एक ढोंग'; राहुल गांधींचा हल्लाबोल