मुंबई - राज्यात विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच असून, उन्हाचा चटका पुन्हा वाढणर आहे. आज जळगावसह काही शहरांना उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ( Torrential rains in some parts of the state ) तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
असे आहे आजचे तापमान - राज्यात ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ( Highest Temperature Recorded In Jalgaon ) सद्या कमाल वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. 43.2 अंश सेल्सियस तापमान येथे नोंदवण्यात आले आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात 42 अंशापेक्षा कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. ( Cloudy weather in the state ) कोकणात कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस, मराठवाड्यात 37 ते 42 अंश सेल्सियस, मध्य महाराष्ट्रात 25 ते 44, तर विदर्भात 39 ते 42 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे.
हेही वाचा - Elon Musk Bought Twitter : उद्योगपती इलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक! 44 अब्ज डॉलरचा व्यव्हार