ETV Bharat / bharat

जामिनानंतर दिशा रवीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...'TRPसाठी न्यूज चॅनलने मला दोषी करार दिला'

author img

By

Published : Mar 14, 2021, 10:42 AM IST

मागच्या महिन्यात जामिनावर सुटका झाल्यानंतर दिशा रवीने पहिल्यांदाचा प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी तीने टि्वटवर निवदेन जारी केले. चार पानांच्या निवेदनात दिशाने माध्यमांवर टीका केली आणि तीला पाठिंबा दर्शवलेल्या लोकांचे आभार मानले आहेत. TRP मिळवण्यासाठी काही चॅनलने मला दोषी करार दिल्याचे तीने म्हटलं.

दिशा रवी
दिशा रवी

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट'शी संबंध असल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर दिशा रवी चर्चेत आली आहे. मागच्या महिन्यात जामिनावर सुटका झाल्यानंतर दिशा रवीने पहिल्यांदाचा प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी तीने टि्वटवर निवदेन जारी केले. चार पानांच्या निवेदनात दिशाने माध्यमांवर टीका केली आणि तीला पाठिंबा दर्शवलेल्या लोकांचे आभार मानले आहेत. TRP मिळवण्यासाठी काही चॅनलने मला दोषी करार दिल्याचे तीने म्हटलं.

आतापर्यंतच्या प्रवासात, जर मला कोणी येत्या पाच वर्षांत स्व:ताला कुठे पाहशील, असा सवाल केला असता. तर त्यांचे उत्तर नक्कीच तुरुंग असे नसते, असे तीने सुरवातीला म्हटलं. कोठडीत घालवलेल्या काळाची आठवण करून देताना, दिशाने लिहिले की, संपूर्ण परिस्थितीला सामोरे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे असा विचार करणं, की ही घटना माझ्यासोबत घडत नाहीये. 13 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस माझ्या दाराजवळ आले नाहीत. त्यांनी मला बोलावले नाही. त्यांनी मला अटक केली नाही. त्यांनी मला पटियाला हाऊस कोर्टात नेले नाही, असा विचार करून त्यावर विश्वास ठेवण्यास मी स्वत: ला भाग पाडले.

तिहार तुरुंगात घालवलेल्या काळाची आठवण करून देताना, दिशा रवी म्हणाली, न्यायालयात काय बोलायचे हे माहित नव्हते आणि जोपर्यंत मला काही समजेल. तोपर्यंत मला पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले, असे ती म्हणाली.

टीव्ही चॅनलनी मला दोषी ठरवलं -

घटनाक्रमांमध्ये माझ्या हक्कांचे उल्लंघन झालं. माझे फोटो सर्व माध्यमांत पसरले. न्यायालयाने नाही, तर टीआरपीसाठी टीव्ही चॅनलनी मला दोषी ठरवलं. माझ्याबद्दल काल्पनिक गोष्टी तयार केल्या गेल्या. कोठडीत मी यासर्वांपासून अनभीज्ञ होते, असे दिशाने म्हटलं.

...तर आपला नाश निश्चित -

5 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर मला पुन्हा तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. पर्यायवरणाबद्दल विचार करणं, हा कधीपासून गुन्हा झाला? यावर तुरुंगात असताना मी सतत विचार करत होते. जर आपण या कायमस्वरूपी लोभ आणि उपभोगाविरूद्ध वेळेवर पावले उचलली नाही. तर आपला नाश निश्चित आहे, असे ती म्हणाली.

पाठिंबा देणाऱ्यांचे मानले आभार -

दिशाने तीला पाठिंबा देणाऱ्या लोकांचे आभार मानले. "मी भाग्यवान होतो की मला प्रो बोनो (जनहित) कायदेशीर मदत मिळाली .पण, ज्यांना ती मिळत नाही, त्यांचे काय? ज्यांच्या गोष्टींची मार्केटींग करता येत नाही त्यांचे काय? असा सवाल तीने केला. विचार मरत नाहीत आणि सत्य, कितीही वेळ लागला तरी नेहमीच बाहेर येते, असे तीने निवेदनाच्या शेवटी म्हटलं.

काय प्रकरण?

शेतकरी आंदोलनासंबंधित पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्वीट केलेल्या टूलकिटचं संपादन केल्याप्रकरणी दिशाला 13 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात सादर केलेले पुरावे अपुरे असल्यामुळे कोर्टानं 23 फेब्रुवारीला दिशाचा जामीन मंजूर केलाय. दिशा रवीचा पार्श्वभूमि गुन्हेगारी स्वरुपाची नाही. कोणत्याही लोकशाही देशामध्ये नागरिक हे सरकारच्या अंतरात्माचे संरक्षक असतात. केवळ सरकारच्या धोरणांशी असहमती असल्याने एखाद्याला तुरुंगात टाकणं हे चुकीचं आहे, असे न्यायाधीशांनी म्हटलं.

हेही वाचा - कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकणे हेच सत्ताधारी पक्षाचे उद्दीष्ट ; यशवंत सिन्हा यांचा भाजपवार हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.