नवी दिल्ली: Clash in flight: या आठवड्याच्या सुरुवातीला बँकॉक ते कोलकाता या 'थाई स्माइल एअरवेज'च्या फ्लाइटमध्ये काही प्रवाशांमध्ये कथितरित्या हाणामारी Clash in flight going from Bangkok to Kolkata झाली. बुधवारी विमानात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये काही सहप्रवासी एका व्यक्तीला अनेक वेळा थप्पड मारताना दिसत आहेत. विमानातील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर रोजी विमान धावपट्टीवरून टेक ऑफ करणार असताना ही घटना घडली. ही व्यक्ती आपल्या आईसोबत कोलकाता येथे जात होती. Bangkok to Kolkata Flight
कोलकाता येथे राहणाऱ्या प्रवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर या घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की त्याला आईची काळजी वाटत होती कारण ती ज्या सीटवर हाणामारी झाली त्या सीटजवळ बसली होती. नंतर, इतर प्रवासी आणि फ्लाइट अटेंडंटने भांडणात सहभागी लोकांना शांत केले. प्रवाशानुसार, भांडणाचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मंगळवारी पहाटे विमान कोलकात्यात पोहोचले. मात्र, विमान उतरल्यानंतर ही घटना कोलकात्याच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली होती की नाही हे लगेच कळू शकले नाही.
व्हिडिओमध्ये, दोन प्रवासी वाद घालताना दिसत आहेत, त्यापैकी एक म्हणतो की तुमचे हात खाली करा आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला थप्पड मारण्यास सुरुवात केली. यानंतर आणखी काही प्रवासीही या भांडणात सामील झाले. यासंदर्भात माहितीसाठी थाय स्माइल एअरवेजशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही. इस्तंबूलहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये प्रवासी आणि फ्लाइट अटेंडंट यांच्यात झालेल्या भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता. विमानातील खाद्यपदार्थ निवडण्यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. ही घटना १६ डिसेंबरची आहे. इंडिगो आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गेल्या आठवड्यात सांगितले की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात २७ डिसेंबर रोजी जैसलमेरहून दिल्लीला 117 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानामधील सीटच्या मागच्या बाजूला कोणीतरी 'या विमानामध्ये बॉम्ब आहे' असे लिहिल्याने सोमवारी दुपारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर Indira Gandhi Airport मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. Delhi Airport या सीटच्या मागे एकही प्रवासी बसला नव्हता. bomb rumors in flight पण, जेव्हा प्रवासी विमानातून उतरणार होते, तेव्हा एका महिला प्रवाशाने सीटच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने लिहिलेला हा भयानक संदेश वाचला. IGI Airport Delhi ही माहिती तातडीने एअर होस्टेस आणि पायलटला देण्यात आली. चौकशी केली असता ही बातमी खोटी निघाली.