नवी दिल्ली - प्रसारमाध्यमांनी स्वत:ला प्रामाणिक पत्रकारितेपुरते मर्यादित ठेवले ( CJI NV Ramana on media ) पाहिजे आणि पत्रकारितेचा वापर आपला प्रभाव आणि व्यावसायिक हितसंबंध वाढवण्यासाठी करू नये, असे सल्ला भारताचे ( CJI NV Ramana on honest journalism ) सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी मंगळवारी दिला. यावेळी व्यावसायिक हितसंबंध नसतानाही, आणीबाणीच्या दिवसांत लोकशाहीसाठी मीडिया लढू शकले होते, अशी आठवण देखील रमणा यांनी करून दिली.
हेही वाचा - सोनिया गांधींची काल 6 तासांहून अधिक काळ चौकशी, आजही 'ईडी'चे बोलावणे
व्यावसायिक हितसंबंध स्वतंत्र पत्रकारितेच्या आड येतात - रमणा हे गुलाबचंद कोठारी यांच्या 'गीता विज्ञान उपनिषद' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला होते. रमणा पुढे म्हणाले की, इतर व्यावसायिक हितसंबंध असलेले मीडिया हाऊस बाह्य दबावांनी असुरक्षित बनते आणि अनेकदा व्यावसायिक हितसंबंध स्वतंत्र पत्रकारितेच्या भावनेला ओलांडतात, ज्यामुळे लोकशाहीशी तडजोड होते.
वस्तुस्थिती मांडणे ही मीडिया हाऊसची जबाबदारी - गेल्या आठवड्यातही, रमणा यांनी अशीच चिंता व्यक्त केली होती. एजेंडा आधारित वादविवाद आणि कांगारू न्यायालये मीडियाद्वारे चालवली जात आहेत, जे लोकशाहीसाठी हानिकारक आहेत, असे रमणा म्हणाले होते. न्यायमूर्ती रमण यांनी मंगळवारी सांगितले की, जेव्हा मीडिया हाऊसचे इतर व्यावसायिक हितसंबंध असतात, तेव्हा ते बाह्य दबावांना असुरक्षित बनते. अनेकदा व्यावसायिक हितसंबंध स्वतंत्र पत्रकारितेचा आत्मा घेतात. परिणामी लोकशाही धोक्यात येते. पत्रकार हे जनतेचे डोळे आणि कान आहेत. वस्तुस्थिती मांडणे ही मीडिया हाऊसची जबाबदारी आहे, असे रमणा म्हणाले.
हितसंबंध वाढवण्यासाठी पत्रकारीतेचा वापर करू नये - विशेषत: भारतात, जे छापले जाते ते खरे आहे असे लोक अजूनही मानतात. मला एवढेच सांगायचे आहे की, प्रसारमाध्यमांनी पत्रकारितेला प्रभाव आणि व्यावसायिक हितसंबंध वाढवण्याचे साधन म्हणून न वापरता प्रामाणिक पत्रकारितेपुरतेच मर्यादित राहिले पाहिजे. मीडिया हाऊसेस, अगदी व्यावसायिक हितसंबंध नसतानाही, आणीबाणीच्या काळ्या दिवसात लोकशाहीसाठी लढू शकले होते, अशी आठवण रमणा यांनी करून दिली.
हेही वाचा - Earthquake in Philippines - उत्तर फिलीपिन्समध्ये 7.0 रिश्टर स्केलचा भूकंप, इमारतींना नुकसान