ETV Bharat / bharat

Nagaland killings: नागालँड पेटले, दहशतवादी समजून सुरक्षा दलाच्या गोळीबारात 11 नागरिकांचा मृत्यू - नागालँड न्यूज

दहशतवादी असल्याच्या संशयातून सुरक्षा दलाच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याने 11 तरुण ( 11 civilians killed in Security Ops ) ठार झाल्याचे वृत्त आहे. मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात तणाव ( Tension in Nagaland ) निर्माण झाला आहे.

Nagaland killings
नागालँड हिंसाचार
author img

By

Published : Dec 5, 2021, 1:04 PM IST

कोहिमा - नागालँडमध्ये ( Nagaland Civilian Killings Updates ) तणाव निर्माण झाला आहे. दहशतवादी असल्याच्या संशयातून सुरक्षा दलाच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याने 11 तरुण ( 11 civilians killed in Security Ops ) ठार झाल्याचे वृत्त आहे. मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात तणाव ( Tension in Nagaland ) निर्माण झाला आहे. संतप्त नागरिकांनी सुरक्षा दलांच्या गाड्या पेटवून दिल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील ( Amit Shah On Nagaland killings ) या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

राज्य सरकारने या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ओटिंग येथे तरुणांच्या हत्येची दुर्दैवी घटना अत्यंत निषेधार्ह आहे, असे नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ ( Chief Minister of Nagaland Neiphiu Rio On Nagaland killings ) म्हणाले. याप्रकरणी उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच पीडितांना कायद्यानुसार न्याय दिला जाईल, असे ते म्हणाले. तसेच नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टि्वट करून या घटनेचा निषेध नोंदवला. नागालँडमध्ये घडलेल्या घटनेचं दु:ख आहे. ज्या लोकांचा यात मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेचा तपास करणार आहे," अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी ट्विटरद्वारे दिली. तसेच भारतीय लष्कराकडून घटनेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी भारतीय लष्कराने (कोर्ट ऑफ इन्वायरी) चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय झालं?

अतिरेकी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यावर सुरक्षा दलाकडून अभियान राबवण्यात आले. या अभियानात अतिरेकी समजून सुरक्षा दलांकडून तरुणांवर गोळीबार झाला. यात 12 तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत तरुण न आल्याने कुटुंबीयांना शोध घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी लोकांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या.

नागालँड हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड भारताचे 16 वे राज्य बनले. याच्या पूर्वेस बर्मा, पश्चिमेस आसाम, उत्तरेस अरुणाचल प्रदेश आणि दक्षिणेस मणिपूर आहे. आसाम व्यतिरिक्त राज्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.