ETV Bharat / bharat

American Citizen Arrests : अमेरिकन नागरिकाच्या सीआयएसएफने आवळल्या मुसक्या, आढळला चीन बनावटीचा सॅटेलाईट फोन - चीनी बनावटीचे सॅटेलाईट

बागडोरा विमानतळावर चीनी बनावटीचा सॅटेलाईट फोन घेऊन प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकाला सीआयएसएफच्या जवानांनी अटक केली. थॉमस इसरोह सेईत्ज असे त्या चीनी बनावटीचा सॅटेलाईट फोन वापरणाऱ्या अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे.

American Citizen Arrests
अमेरिकन नागरिक थॉमस इसरोह सेईत्ज
author img

By

Published : Jan 21, 2023, 5:47 PM IST

सिलिगुडी - बागडोगरा येथे चीनी बनावटीचे सॅटेलाईट घेऊन प्रवास करणाऱ्या नागरिकाला सीआयएसएफने अटक केली. शुक्रवारी बागडोगरा विमानतळावर सीआयएसएफने झाडझडती घेतली. यावेळी थॉमस इसरोह सेईत्ज ( वय 45 ) याच्याजवळ चीन बनावटीचे सॅटेलाईट आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केले आहे. त्याच्याकडून चीनी बनावटीचे सॅटेलाईट जप्त करण्यात आले आहे. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसाही पोलिसांनी जप्त केला आहे.

American Citizen Arrests
चीन बनावटीचा साटेलाईट फोन

तीन अमेरिकन नागरिक निघाले होते दिल्लीला : बागडोरा विमानतळावरुन तीन अमेरिकन नागरिक दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे सीआयएसएफच्या जवानांनी त्यांचे सामान चेक केले. यावेळी त्यांच्या सामानात चीनी बनावटीचे सॅटेलाईट असल्याचे आडळून आले. त्यामुळे त्यांना सुरक्षा दलाने या सॅटेलाईटबाबत कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही. त्यामुळे सीआयएसएफच्या जवानांनी त्यांना अटक करुन तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

American Citizen Arrests
थॉमस इसरोह सेईत्ज

आर्मी ड्रोन प्रशिक्षणासाठी गेले होते सिक्कीमला : पोलिसांनी या प्रकरणी सीआयएसएफच्या जवानांच्या तक्रारीवरुन या अमेरिकन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या आणखी एका साथिदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे तिघेही एका अमेरिकन कंपनीचे कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे. ही कंपनी सॅटेलाईट कंपनी कार्गोमधून हे सॅटेलाईट फोन इतर देशात पुरवठा करते. हे अमेरिकन नागरिक 12 जानेवारीला भारतात आले होते. त्यानंतर ते सिक्कीममधील लाचूंगला आर्मी ड्रोन प्रशिक्षणासाठी गेले होते.

American Citizen Arrests
पासपोर्ट

सॅटेलाईट फोन घेऊन प्रवास करता येत नाही : विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार कोणत्याही नागरिकाला सॅटेलाईट फोन घेऊन विमान प्रवास करता येत नाही. फक्त बीएसएनएलच्या सॅटेलाईट फोनला यातून मुभा देण्यात आली आहे. मात्र या अमेरिकन नागरिकांनी सॅटेलाईट फोन घेऊन प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यातील एका प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहिती बागडोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी निर्मल दास यांनी दिली. पुढील चौकशी सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

अमेरिकन नागरिक स्पाय आहे की ड्रोन ट्रेनर : बागडोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अमेरिकन नागरिक थॉमसची कसून चौकशी करत आहेत. तो भारतीय सैन्याला ड्रोनचे प्रशिक्षण देण्यास आल्याची माहिती त्याच्याकडून देण्यात आली आहे. मात्र तो हेरगिरी करण्यासाठी तर भारतात आला नाही ना याची कसून चौकशी करण्यात येत आहे. शिल्ड या अमेरिकन कंपनी आणि भारतीय कंपनी जेएसडब्लु यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्याला ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती भारतीय सैन्यदलाच्या वतीने देण्यात आली आहे.

जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतात आल्याचा दावा : अमेरिकन नागरिकाला चीनी बनावटीच्या सॅटेलाईटसह पकडण्यात आले आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र आपण भारतीय जवानांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यासाठी भारतात आल्याचा दावा थॉमसने केला आहे. प्रशिक्षण संपवून आपण बागडोरा विमानतळावरुन दिल्लीला जाण्यासाठी निघालो होतो. तेथून अमेरिकेत आपल्याला जायचे असल्याचेही त्याने म्हटले आहे. मात्र सीआयएसएफच्या जवानांनी स्कॅनरमध्ये सॅटेलाईट चेक केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

दुर्गम भागात संवादासाठी वापरले जाते सॅटेलाईट : भारतात सॅटेलाईट फोन नागरिकांना वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. अतिशय दुर्गम भागात संवाद साधण्यासाठी सॅटेलाईट फोनचा उपयोग केला जातो. त्यामुळे बऱ्याचदा अतिरेकी कारवाया होण्याचा धोका आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिक असलेल्या थॉमसला बागडोरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - Sexbot Gets Stuck Like This : सावधान आपली एक चूक धोकादायक ठरु शकते, सेक्सबॉट्सच्या खेळात असे अडकत आहेत सामान्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.