नई दिल्ली: चिराग पासवान यांनी वडील दिवंगत रामविलास पासवान यांचा दिल्लीतील बंगला रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिपत्याखालील इस्टेट संचालनालयाचे पथक तेथे पोहोचले होते. दिल्लीतील जनपथ येथे हा बंगला आहे.
-
Delhi | LJP MP Chirag Paswan vacates the bungalow that was earlier allotted to the former Union Minister and his late father Ram Vilas Paswan. The bungalow is being vacated under the notice of the Directorate of Estates pic.twitter.com/yBSNbNkfjS
— ANI (@ANI) March 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi | LJP MP Chirag Paswan vacates the bungalow that was earlier allotted to the former Union Minister and his late father Ram Vilas Paswan. The bungalow is being vacated under the notice of the Directorate of Estates pic.twitter.com/yBSNbNkfjS
— ANI (@ANI) March 30, 2022Delhi | LJP MP Chirag Paswan vacates the bungalow that was earlier allotted to the former Union Minister and his late father Ram Vilas Paswan. The bungalow is being vacated under the notice of the Directorate of Estates pic.twitter.com/yBSNbNkfjS
— ANI (@ANI) March 30, 2022
पासवान यांच्याकडून बंगला खाली - लोक जनशक्ती पक्षाचा अधिकृत पत्ता असलेल्या 12 जनपथ येथील पासवान यांच्या बंगल्यातून सामान हलवण्यात आले आहे. येथे पोलीस पथकही उपस्थित होते. हा बंगला केंद्रीय मंत्र्यांसाठी असल्याचे सदस्याच्या निधनानंतर किंवा कार्यकाल संपल्यानंतर तो खाली कारावा लागतो. त्या नियमानुसार पासवान यांच्याकडून बंगला खाली केला जात आहे.
1989 पासून ते अनेकदा केंद्र सरकारमध्ये मंत्री होते - या बंगल्याचा नियमितपणे पक्ष संघटनात्मक बैठका आणि इतर संबंधित कार्यक्रमांसाठी वापर केला जात होता. देशातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक असलेले रामविलास पासवान यांचे (ऑक्टोबर 2020)मध्ये वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. 1989 पासून ते अनेकदा केंद्र सरकारमध्ये मंत्री होते.
हेही वाचा - Mamata letter To Opposition : पाच राज्यांतील अपयश! एकत्र येण्याबाबत विरोधी पक्षांना ममतांचे पत्र