गांधीनगर - गुजरात सरकारने निवडूंग प्रवर्गातील 'ड्रॅगन फ्रूट'चे नाव बदलून टाकले आहे. या फळाला आता 'कमलम' असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. शहरे, विद्यापीठ आणि गावांची नावे बदलण्याची मागणी होत असल्याचे आत्तापर्यंत ऐकलं होते. मात्र, गुजरात सरकारने धाडसी निर्णय घेत फळाचेच नाव बदलले आहे. हे नाव चीनशी संबधित वाटत असल्याने आम्ही बदलल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या गुजरातमधील कार्यालयाचे नावही 'कमलम' आहे.
कमळासारखे दिसत असल्याने नाव बदलले -
ड्रॅगन हे नाव फळासाठी योग्य वाटत नाही. हे फळ कमळासारखे दिसते. त्यामुळे या फळाचे नाव आजपासून कमलम असे ठेवण्यात येत आहे, अशी घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केली. गुजरात सरकारने या फळाचे नाव बदलल्यानंतर या नावाच पेटंटही दाखल केला आहे. तर या फळाला कमलम म्हणण्यास सुरूवात केली आहे. गुजरातचे फलोत्पादन विकास धोरण जाहीर करताना मुख्यत्र्यांनी ही घोषणा केली.
![विजय रुपानी - गुजरातचे मुख्यमंत्री](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10301874-523-10301874-1611062950854_1901newsroom_1611076139_720.jpg)
यामागे कोणतेही राजकारण नाही - मुख्यमंत्री
ड्रॅगन फ्रूटला पिताया नावानेही ओळखले जाते. या फळाचे वैज्ञानिक नाव हिलोकेरियस कॅक्टस असे आहे. हे फळ कमळासारखे दिसत असून त्याला ड्रॅगन हे नाव योग्य वाटत नाही. कमलम हा संस्कृत शब्द असून फळ कमळाच्या आकाराचे आहे. त्यामुळे आम्ही या फळाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यात कोणतही राजकारण नाही. इंडियन अॅग्रिकल्चर रिसर्चकडे आम्ही कमलम हे नाव देण्यासाठी प्रस्ताव ठेवल्याचेही मुख्यंत्री रुपानी यांनी सांगितले.
![ड्रॅगन फ्रूट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4191147-thumbnail-3x2-ssss_1901newsroom_1611076139_539.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ जुलै २०२० ला झालेल्या मन की बात कार्यक्रमात या फळाचा उल्लेख केला होता. गुजरात राज्यात ड्रॅगन फळाचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यातही या फळाचे उत्पादन घेतले जाते.
![ड्रॅगन फ्रूट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/dragon-fruit_1901newsroom_1611076139_779.jpg)