ETV Bharat / bharat

भारत अफगाणिस्तानच्या घडामोडीत गुंग; चीनकडून हिंद महासागारात पोहोचण्याचा नवा मार्ग खुला - चीन रणनीती

चीनने हिंद महासागरातून व्यापाराची रणनीती तयार करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. याबाबतचा रिपोर्ट वरिष्ठ पत्रकार संजीब केआर बरुराह यांनी लिहिला आहे.

Indian Ocean via Myanmar
Indian Ocean via Myanmar
author img

By

Published : Aug 31, 2021, 7:38 PM IST

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्मघाती हल्ल्यात झालेला विध्वंस जगाने टीव्ही स्क्रीनवर पाहिला आहे. त्याचवेळी निळी मालवाहू आणि लाल इंजिन असलेली रेल्वे ही गोपनीय पद्धतीने चेंगदूमधील आंतरराष्ट्रीय रेल्वे पोर्टसाठी पोहोचण्यासाठी तयार झाली.

प्रत्यक्षात ही घटना खूप साधी वाटेल, पण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण, चीनने समुद्र-जमीन आणि रेल्वे लिंकचा वापर करून हिंद महासागरासाठी नवीन मार्ग सुरू केला आहे. हा विकास रणनीतीसाठी प्रभावशाली आहे. त्यामुळे भारतासाठी हा नवीन मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

हेही वाचा-...म्हणून अफगाणिस्तानातून विदेशी नागरिकांची विमानाने तातडी करावी लागणार सुटका

लिनकांगपासून चेंगदूपर्यंत रेल्वेने जाण्यासाठी केवळ तीन दिवस लागणार

काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये चाचणी करण्यासाठी मालवाहू रेल्वेत माल टाकण्यात आला होता. ही रेल्वे समुद्रामधून म्यानमारमधील यांगून जहाज बंदरावर पोहोचली होती. तेथून रस्ते मार्गाने म्यानमारमधील एका भागातून पोहोचत चेंगदूच्या मार्गाने चीनच्या युन्ना प्रांतामधील लिनकांगमध्ये पोहोचली होती. काही दिवसांपूर्वीच 26 ऑगस्टला चेंगदूवरून लिनकांगपर्यंत रेल्वे लिंकच्या मार्गाचे उद्घाटन झाले होते. लिनकांग म्यानमारमधील शान राज्य हे चीनच्या श्वे हॉ या शहराच्या सीमावर्ती भागात आहे. लिनकांगपासून चेंगदूपर्यंत रेल्वेने जाण्यासाठी केवळ तीन दिवस लागणार आहेत.

हेही वाचा-मृत्यूपेक्षा तालिबानची भीती अधिक; बॉम्बस्फोटानंतरही काबूल विमानतळाबाहेर लोकांची गर्दी

चीनपासून युरोपपर्यंत कमीत कमी 70 देशांना जोडण्याची योजना-

चीनच्या बेल्ट अँड रोड एनिशिएयटिव्हच्या (बीआरआय) माध्यमातून चीनमधील श्वे हॉपासून म्यानमारपर्यंत आर्थिस सहकार्य आहे. 2013 च्या सुरुवातीला चीनच्या प्रमुखांनी व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन बीआरआय योजना जाहीर केली. या योजनेतून मध्य आशिया, पश्चिम आशिया आणि रशियाच्या माध्यमातून चीनपासून युरोपपर्यंत कमीत कमी 70 देशांना जोडण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि जहाजमार्ग जोडण्यासाठी वैश्विक नेटवर्क स्थापित करण्याची योजना तयार केली आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानात पुन्हा रॉकेट हल्ला; एक मुलगा ठार

पूर्वेकडे पाहण्याचे भारताचे धोरण डळमळीत-

भारताची पूर्वेच्या धोरणाबाबत डळमळीत भूमिका असताना चीनने नवीन लिंक सुरू केली आहे. भारताने 1991 नंतर पूर्वेकडे पहा, असे धोरण सुरू केले होते. त्यामध्ये चीनच्या वाढत्या रणनीतीच्या धोरणाला कमकुवत करणे हा उद्देश होता. भारताने दक्षिण आशियातील देशांसह पूर्व आशियातील देशांबरोबर व्यापक आर्थिक आणि रणनीतीचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केले. त्यामधून आशियान या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेची स्थापना करण्यात आली.

नवीन म्यानमार-चीन मार्ग सिंगापूरवरून चेंगदूला जाण्यासाठी 20 दिवसांहून कमी वेळ लागणार आहे. चीनमधून हिंदी महासागर, तेथून थेट पश्चिम आशिया, युरोप आणि अटलांटिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी चीनचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.