ETV Bharat / bharat

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने ठोठावले दार?, लहान मुलांना संसर्ग

author img

By

Published : Aug 14, 2021, 2:17 PM IST

कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यातच येणार असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेचे संकेत कर्नाटक, पंजाबमधून येत आहे. कर्नाटक आणि पंजाब राज्यात लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

Third wave is coming Spike in COVID cases among children
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने ठोठावले दार?, लहान मुलांना संसर्ग

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर आहे. देशातील दुसरी लाट अटोक्यात आल्याचे चित्र असले, तरी यातच कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यातच येणार असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेचे संकेत कर्नाटक, पंजाबमधून येत आहे. कर्नाटक आणि पंजाब राज्यात लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. बंगळुरूमध्ये तब्बल 543 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर उत्तराखंडमध्ये 46 तर पंजाबच्या लुधियानामध्ये 20 लहान मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे. अनेक तज्ञ यास मोठा धोका मानत आहेत.

केरळमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे सतत वाढत असून ज्यांनी कोरोना लस घेतली आहे. त्यांनाही विषाणूचा संसर्ग होत आहे. केरळमध्ये सकारात्मकतेचा दर 14%पेक्षा जास्त आहे. केरळच्या 9 जिल्ह्यांत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांनाही करोनाच्या डेल्टा प्रकाराने संसर्ग होत आहे. कोरोनाच्या नवीन उत्परिवर्तनामुळे लसीचा प्रभाव कमी होत आहे की नाही, याचा तपास केंद्राची टीम करत आहे.

आयआयटी हैदराबाद आणि कानपूरच्या तज्ञांनी तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये उच्चांक गाठू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. आज 14 ऑगस्ट म्हणजेच महिन्याच्या मध्यावर आहे. गेल्या 7 दिवसांपासून कोरोनाचे 40 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील 57.7 टक्के प्रकरणे केरळमधून येत आहेत. जर देशाच्या स्तरावर कोरोनाच्या नवीन रुग्णांचे मूल्यांकन केले. तर देशातील 84.29 टक्के प्रकरणे 5 राज्यांतून समोर (केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक) येत आहेत. तर देशातील उर्वरित राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. गेल्या 18 दिवसांपासून सकारात्मकतेचा दर 3 टक्क्यांच्या खाली आहे. साप्ताहिक संसर्गाचा दर देखील 2.13 टक्के आहे.

सीरो सर्वेक्षणातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील 67 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या सकारात्मक आढळली आहे. भारतात 522 दशलक्षांहून अधिक लोकांना लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस देण्यात आला आहे. यामुळे संसर्गाचा वेग कमी होईल. तिसरी लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेइतकी जीवघेणी ठरणार नाही, असे अहवालात म्हटलं आहे.

मुलांचा कोरोनापासून कसा करावा बचाव -

  • भारतात अद्याप मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोना झाला नाही. त्यामुळे घाबरून जावू नये.
  • 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे. लहान मुलांना मास्कमध्ये गुदमरल्यासारखे वाटू शकते.
  • खेळताना किंवा धावताना मुलांचा मास्क हटवा.
  • सर्व मुलांना सॅनिटायझेशनबद्दल जागरूक करा.
  • 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना सॅनिटायझर वापरायला शिकवा.

कोणत्या रोगाच्या फक्त एक दोन नाही तर अनेक लाटा येतात. तज्ञांच्या मते, कोरोना स्वरूप बदलत आहे. त्यामुळे अनेक लाटा येण्याची शक्यता आहे. स्पॅनिश फ्लूच्या चार लाटा आल्या होत्या. रुग्णांच्या संख्येवरून लाट ओळखावी. आपल्या क्षेत्रातील रुग्णांच्या लक्ष ठेवावे. रुग्ण संख्या वाढली, तर लक्षात घ्या, कोरोनाची तिसरी लाट आली आहे. सध्यातरी केरळ वगळता भारताच्या इतर राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती नाही. तरीही खबरदारी घेणे, गरजेचे आहे.

हेही वाचा - पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांसाठी आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

हेही वाचा - VIDEO : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून

हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कसं सुरक्षित ठेवायचं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.