पानिपत (हरियाणा) : हरियाणातील पानिपतमधून एक अशी बातमी समोर आली आहे जी प्रत्येक पालकांसाठी खूप महत्त्वाची आहे. पानिपत जिल्ह्यातील भालसी गावात एका 13 वर्षाच्या मुलाने खेळत असताना चुकून गळफास लावून घेतला. (child hang himself while playing). त्यात त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे वडील कोशर यांनी सांगितले की, ते मूळचे पश्चिम बंगालच्या इस्लामपूर भागातील रहिवासी आहेत. ते जवळपास एक वर्षापासून पानिपतच्या भालसी गावात आपल्या मुलांसह राहत आहेत. (child hang himself while playing in Panipat)
खेळत असताना चुकून लागला फास - मुलाचे वडिल डाई हाऊसमध्ये काम करतात. सकाळी ते कामावर गेले होते. तर त्यांची पत्नी नर्गिस आणि तीन मुले घरीच होती. घरी खेळत असताना मुलगा रिकाम्या क्वार्टरच्या छताला लटकलेल्या कापडाच्या फासावर लटकल्या गेला. बराच वेळ मुलगा परत न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचवेळी नाझिमच्या धाकट्या भावाने तो फासावर लटकत असल्याचे पाहिले. त्याने लगेचच कुटुंबीयांना बोलावले. मुलाला खोड्यावरून खाली काढले तेव्हा तो श्वास घेत होता. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला काही वेळातच मृत घोषित केले. रुग्णालयाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खासगी रुग्णालय गाठले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवत तपास सुरू केला आहे.