ETV Bharat / bharat

Horrific Accident in Chikkaballapur : कर्नाटकात टाटा सुमोचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू - राष्ट्रीय महामार्ग क्रं 44

Horrific Accident in Chikkaballapur : कर्नाटकातील चिक्कबल्लापूर इथं राष्ट्रीय महामार्ग क्रं. 44 वर टाटा सुमोचा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात लहान मुलांसह 12 जणांचा मृत्यू झालाय.

Horrific Accident in Chikkaballapur
Horrific Accident in Chikkaballapur
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 9:24 AM IST

Updated : Oct 26, 2023, 2:39 PM IST

चिक्कबल्लापूर Horrific Accident in Chikkaballapur : कर्नाटकातील चिक्कबल्लापूर इथं टाटा सुमोचा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात लहान मुलांसह 12 जणांचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय महामार्ग क्रं. 44 वर हा अपघात झाला आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हे प्रवासी आंध्र प्रदेशातून बेंगळुरूला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या टाटा सुमोमध्ये 18 जण प्रवास करत होते. अपघातातील सर्व मृत आंध्र प्रदेशातील असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आज पहाटे राष्ट्रीय महामार्ग 44 वर चिक्कबल्लापूर हद्दीत पार्क केलेल्या सिमेंट लॉरीला टाटा सुमोनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलंय.

चार महिलांसह 12 जण ठार : पोलिसांनी सांगितलं की, हा अपघात चिक्कबल्लापूर शहराच्या जिल्हा मुख्यालयाच्या हद्दीत घडला. सूत्रांनी सांगितलं की, ही सुमो बागेपल्लीहून चिक्कबल्लापूरकडे जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला धडक दिली, परिणामी चार महिलांसह 12 प्रवासी जागीच ठार झाले. ते म्हणाले की, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तामिळनाडूमध्ये यापूर्वी सुमोची एका सरकारी बसला झाली होती टक्कर : यापूर्वी 23 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री उशिरा अंधानूर बायपासवर तमिळनाडूतील तिरुवन्नमलाई इथंही असाच अपघात झाला होता. ज्यामध्ये कार आणि सरकारी बस यांच्यात धडक झाली होती. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तिरुवन्नमलाईहून बंगळुरूला जाणाऱ्या या टाटा सुमोमध्ये 10 जण बसले होते. त्यावेळी सेंगमजवळ सरकारी बसला धडक बसली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना सेंगम शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. हा अपघात कसा घडला याचा तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या या दोन अपघातांमधील एक साम्य म्हणजे दोन्ही अपघात सकाळी घडले.

हेही वाचा :

  1. Fire Breaks in Pathankot Express : 'त्या' रेल्वे कर्मचाऱ्यामुळे पठाणकोट एक्सप्रेसमधील आगीची मोठी दुर्घटना टळली, जाणून घ्या सविस्तर
  2. Shahpur Bus Accident : शिंदे गटाच्या मेळाव्यात आलेल्या दोन एसटी बसला ट्रकची जोरदार धडक; अपघातात २५ कार्यकर्ते जखमी.. पाहा व्हिडिओ

Last Updated : Oct 26, 2023, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.