वाराणसी (यू.पी) - ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणातील अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीचे प्रमुख वकील अभय नाथ यादव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास त्यांना अस्वस्थता आणि छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा - Al Qaeda leader death : सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अलकायदाचा दहशतवादी अल-जवाहरी अफगाणिस्तानात ठार
अभय नाथ यादव हे वाराणसीतील विविध न्यायालयात चालणाऱ्या मुस्लिम पक्षांच्या सर्व खटल्यांमध्ये मुख्य वकील म्हणून काम करत होते. त्याचवेळी अभय नाथ हे सध्या सुरू असलेल्या ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणाचा खटला लढत होते. त्यांच्या निधनामुळे न्यायालयाने ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी 4 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.
काय आहे ज्ञानवापी मशीद - ज्ञानवापी मशीद औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून बांधली असा दावा अनेकांनी केला आहे. हा मंदिर-मशीद वाद वर्षानुवर्षे जुना असून (213) वर्षांपूर्वी त्यावरून दंगली झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर या मुद्द्यावरून दंगल झाली नाही. ( Gyanvapi Masjid ) अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा तापल्यानंतर (1991) मध्ये ज्ञानवापी हटवून त्याची जमीन काशी विश्वनाथ मंदिराला द्यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.