बिलासपूर (छत्तीसगढ) - छत्तीसगढ उच्च न्यायालयाने 14 वर्षीय मुलीला गर्भपाताची परवानगी ( Chhattisgarh high court allows minor girl abortion) दिली आहे. अल्पवयीन मुलीची गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी उच्च न्यायालयाने सिम्स मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ डॉक्टरांना संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या आईने उच्च न्यायालयाकडे गर्भपाताची परवानगी मागितली होती.
हेही वाचा - Celebration At Panipat : नीरजच्या यशानंतर गावात जल्लोष, आई म्हणाली चुरमा करून खाऊ घालणार
नातेवाईकाने गर्भवती केले - 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाईकाने गर्भवती केले होते. ती गरोदर असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
मुलीची तपासणी करण्याचे दिले होते निर्देश - अल्पवयीन मुलीच्या आईने उच्च न्यायालयात गर्भधारणा संपविण्याची परवानगी मागितली होती. या प्रकरणी छत्तीसगढ उच्च न्यायालयाने सिम्स मेडिकल कॉलेजला मुलीची वैद्यकीय तपासणी करून ती गर्भपातासाठी पात्र असल्याचे तपासण्याचे निर्देश दिले होते. तपासाअंती गर्भपाताची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाने गर्भपात करण्याचे आदेश दिले.